ताज्या घडामोडी

विजयादशमी च्या शुभपर्वावर राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त अंजनविहिरे येथे राबवले स्वच्छता अभियान

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील विजयादशमी च्या शुभपर्वावर राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त अंजनविहिरे येथे राबवले स्वच्छता अभियान

विजया दशमी अर्थात दसरा निमित्ताने तमाम गावकरी मित्रांना विजया दशमी च्या हार्दिक शुभेच्छा देत अंजन विहीरे येथे राबवले स्वच्छता अभियान
राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांची जयंती या महापुरुषांना नमनकरून
अंजनविहिरे गावाला श्रमदान च्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवले गेले. कर्तव्यनिष्ठ लोकांनी सहभाग घेतला त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे तसेच JCB च्या सहाय्याने जि प मराठी शाळेच्या मागे रस्ता व दलित वस्तीला लागुन असलेल्या गटारीचे खोलीकरण केले मनस्वी समाधान लाभले.
कर्तव्याला जागत कार्यशील राहणे हेच तर खरे जीवंत असण्याचे लक्षण आहे. कर्तव्य पुर्ती साठी संधी लाभणे हे सुद्धा परमभाग्याच म्हणायचे असते सामाजिक कार्यात ज्या ज्या समाज बांधवांनी सहभाग घेतला त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून असेच कार्य करण्याचे त्यांना प्रेरणा मिळो अशा शुभेच्छा नागरिक देत आहेत त्याचबरोबर निर्भीड स्वाभिमानी विकास मंच चे सयोजक यांनी हे अभियान राबवले त्यांचेही कौतुक होत आहे.

 

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??