ताज्या घडामोडी

नव दुर्गा विशेष (माता महागौरी) किरण बेदी,माजी: भारतीय पोलीस सेवा अधिकारी

जे नाव म्हणजे शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि निर्भय नेतृत्वाचे प्रतीक आहे. ज्या भारताच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी असून त्यांनी पोलीस दलात अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या. त्यांच्या कार्यशैलीमुळे आणि कठोर निर्णयक्षमतेमुळे त्या देशभर प्रसिद्ध झाल्या. अश्या आजच्या आपल्या नव दुर्गा (२०२५) आहेत माजी: भारतीय पोलीस सेवा अधिकारी डॉ. किरण बेदी. नवरात्र विशेष २०२५ निमित्ताने रिता इंडिया फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. रिता शेटीया यांनी त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.

डॉ. किरण बेदी यांच्या विषयी..
डॉ. किरण बेदी यांचा जन्म ९ जून १९४९ रोजी अमृतसर, पंजाब येथे झाला. शालेय शिक्षण अमृतसरमध्ये झाले. इंग्रजी साहित्यात पदवी घेतल्यानंतर कायद्याचे शिक्षण त्यांनी घेतले. त्यानंतर आयआयटी दिल्ली विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली आणि पोस्ट डॉक्टरेट नेहरू फेलोशिप प्राप्त केली. १९७२ साली त्या भारतीय पोलीस सेवेत (IPS) सामील झाल्या. त्यानंतर दिल्ली, गोवा, मिजोरम आणि चंदीगड येथे महत्त्वाच्या पदांवर केले आहे. दिल्लीच्या तिहार तुरुंगात अधीक्षकपदी असताना त्यांनी अनेक सुधारणा केल्या. कैद्यांसाठी शिक्षण, योगा आणि सुधारणा कार्यक्रम राबवून तुरुंग व्यवस्थापनात बदल घडवले. तसेच महिला सबलीकरण आणि प्रशासनिक सुधारणांसाठी त्यांनी भरीव योगदान दिले आहे. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली असून त्यांचे अलीकडील पुस्तक म्हणजे ‘फिअरलेस गव्हर्नन्स’, जे आता हिंदी, तमिळ, मराठी आणि मल्याळम भाषेत अनुवादित झाले आहे. पुद्दुचेरीचे उपराज्यपाल म्हणून काम करताना त्यांनी पाहिलेल्या वास्तवावर आधारित हे पुस्तक आहे. तसेच त्यांनी पुद्दुचेरीच्या २४ व्या उपराज्यपाल (लेफ्टनंट गव्हर्नर) म्हणून काम पहिले आहे. याचबरोबर संयुक्त राष्ट्रांमध्ये शांतता मोहिमांमध्ये नागरी पोलिस सल्लागार म्हणून काम केले आहे. २०११ मध्ये अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी चळवळीतील त्या प्रमुख नेत्यांपैकी एक होत्या. २०१५ मध्ये, त्या भारतीय जनता पक्षात (भाजप) सामील झाल्या आणि २०१५ च्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून लढल्या. त्या पोलीस अधिकारी होण्याआधी उत्कृष्ट टेनिस खेळाडू होत्या. टेनिस कोर्टवरच त्यांची भेट ब्रिज बेदी यांच्याशी झाली. त्यांचा प्रेमविवाह १९७२ साली झाला. त्याच वर्षी त्या आय.पी.एस.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. ब्रिज बेदी हे त्यांना सरकारी नोकरीसाठी नेहमी प्रोत्साहित करीत राहिले. एका कर्तबगार स्त्रीच्या पाठीमागे एक पुरुषाचा हात होता. घरातून पाठबळ असेल, तर स्त्री किती उत्तुंग भरारी मारू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांचे पती ज्यांच्या मुळे हे सर्व शक्य झाले.
सध्या डॉ. किरण बेदी सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत याविषयी
डॉ. किरण बेदी लीडरशिप लर्निंग (केबीएलएल) च्या अंतर्गत दोन अग्रगण्य संस्था – नवज्योती इंडिया फाउंडेशन (१९८८) आणि इंडिया व्हिजन फाउंडेशन (१९९४) या संस्था स्थापन केल्या असून तळागाळातील प्रशासन, सार्वजनिक सेवा आणि नैतिक नेतृत्वाच्या दशकांमध्ये रुजलेले, केबीएलएल हे पुढील पिढीतील बदल घडवणाऱ्यांना सक्षम करणारे प्रत्यक्ष आणि प्रशिक्षण कार्यक्रम देण्यासाठी डिझाइन केलेले आहे. तसेच शिक्षण आणि पुनर्वसन यांसाठी हि संस्था कार्य करते. ज्या जगात उद्देशपूर्ण बदलाची आवश्यकता आहे, तिथे किरण बेदी लीडरशिप लर्निंग्ज (केबीएलएल) आजच्या तरुण पिढीला प्रत्यक्ष प्रशिक्षण, नैतिक प्रशासन पद्धती आणि समुदाय-चालित नेतृत्वाने सुसज्ज करते आहे. जिथे वास्तविकतेत परिवर्तन घडत आहे. दूरदर्शी डॉ. किरण बेदी यांनी त्यांच्या अग्रगण्य फाउंडेशन्स नवज्योती इंडिया फाउंडेशन आणि इंडिया व्हिजन फाउंडेशन द्वारे स्थापन केलेले केबीएलएल हे नेतृत्व कार्यक्रमावर भर देत प्रामाणिकपणा, नावीन्य आणि प्रभावाने सेवा करण्याचे, सेवा देण्याचे आणि प्रभावशाली नेतृत्व घडविणारे असे फाउंडेशन आहे. तळागाळातील २१-३० वयोगटातील बॅचलर पदवी असलेल्या तरुण आणि तरुणी यामध्ये सहभागी होऊ शकतात. गुन्हेगारी रोखण्याचे आणि सामाजिक विकासाचे अंतिम उद्दिष्ट असलेले मुले, महिला, युवक आणि मोठ्या प्रमाणात समुदायासाठी आमची संस्था कार्य करत असून गुन्हेगारी रोखण्याचे आमचे ध्येय आहे. आम्हाला विश्वास आहे की यामुळे सामाजिक-आर्थिक असमानतेला आव्हान मिळेल आणि समाजातील या असुरक्षित घटकांना स्वावलंबी होण्याच्या ध्येयाकडे नेण्यास मदत होईल.
डॉ. किरण बेदी यांच्या जीवन प्रवासातील काही अनुभव
मसूरी येथील राष्ट्रीय अकादमीमध्ये पोलीस ट्रेनिंगमध्ये ८० पुरुष तुकडीतील मी एकमेव आयपीएस अधिकारी महिला होते. जेव्हा कोणी आयाबहिणींची छेड काढायचं तेव्हा मी भर बाजारात त्यांना चोप द्यायचे. मुलींमध्ये जागृती निर्माण करण्याचा निर्धार मी केला होता. हुंडा प्रथेविरुद्ध आवाज हि उठवला. शौर्य, निर्भयता, प्रेम, सत्य, सामर्थ्य अशा गोष्टींची तळमळ असल्याने मी माझे कार्य चोख पणे करत होते. तिहार जेलमध्ये काम करत असताना तेथील कैदी काही साधे कैदी नव्हते. अशा कैद्यांच्यात सुधारणा घडवून आणल्यामुळे माझी जागतिक स्तरावर प्रशंसा ही झाली. 1981 मध्ये दिल्लीतील ट्राफिक डीसीपी हे पद माझ्याकडे आले, त्यावेळी मी खूप वेगवेगळे प्रश्न सोडवले आणि वाहतूक कोंडी यांच्यावर उपाय काढला. शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा घडवून आणली. अवैध पार्किंगवर सुद्धा मी निर्बंध व नियम लावले. 1983 मध्ये माझी बदली गोवा येथे एसीपी ट्राफिक पोलीस म्हणून झाली. 1984 मध्ये पुन्हा मी दिल्लीमध्ये आले आणि रेल्वे सुरक्षा बल येथे उपकमांडट म्हणून मला पदवी मिळाली. 1985 मध्ये मी दिल्लीतील पोलीस मुख्यालय खूप चांगल्या प्रकारे सांभाळून आपले कौशल्य दाखवले. असे सर्व काही करणारी मी पहिलीच महिला होते.
डॉ. किरण बेदी यांना मिळालेल्या पुरस्कारां विषयी
डॉ. किरण बेदी याना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळलेले आहेत त्यापैकी काही महत्वाचे. रॅमन मॅगसेसे पुरस्कार (१९९४), वुमन ऑफ द ईयर (1980), प्रेसिडेंट्स गॉल्ड मेडल’, “लो ओरियल पेरिस फेमिना महिला पुरस्कार” (2014), ‘‘मदर टेरेसा मेमोरियल राष्ट्रीय पुरस्कार” (2005), राय विद्यापीठाने डॉक्टर ऑफ पब्लिक सर्व्हिस पुरस्काराची मानद पदवी प्रदान केली (2013), आशियाई टेनिस विजेता, शौर्य पुरस्कार विजेता, अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार. देशाच्या पहिल्या IPS महिला अधिकारी किरण बेदी, त्याच्या कष्टाबद्दल फार थोड्या लोकांना माहित आहे. पण आता ही कथा चित्रपटाच्या रूपात पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ११ जून रोजी, निर्मात्यांनी या बायोपिकची घोषणा करणारा व्हिडिओ शेअर केला आहे. किरण बेदी यांच्या बायोपिकाला ‘बेदी’ हे नाव देण्यात आले असून लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
जीवनात आनंदी राहायचे असेल तर जे काम आवडेल ते करा, हा सन्देश त्यानी दिला आहे.
शब्दांकन
डॉ. रिता मदनलाल शेटीया
संस्थापिका रिता इंडिया फाउंडेशन

 

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??