व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेस १६ लाख ९४ हजार रुपयांचा निव्वळ नफा

मुरूम, ता. उमरगा, ता.१५ (प्रतिनिधी) : येथील व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (ता.१४) रोजी उत्सवाच्या वातावरणात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी पंडित चिलोबा होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करून दीप्रज्वलन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष उमेश कारभारी, सचिव श्रीकांत मिणीयार, उपाध्यक्ष अशोक चव्हाण, संचालक अंबाजी बिराजदार, रवींद्र ख्याडे, शशिकांत बाबशेट्टी, दत्तात्रय गिरिबा, सुरेश रणसुरे, प्रवीण सोलापुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी श्रीकांत मिणीयार म्हणाले की, यंदाच्या आर्थिक वर्षात पतसंस्थेस १६ लाख ९४ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचे सांगून या पतसंस्थेकडे यंदा ३७ लाख ४० हजार ६२५ रुपयाचे भाग भांडवल, ८ कोटी ३१ लाख ४९ हजार ३८५ रुपयाच्या ठेवी, संस्थेने ६ कोटी ५० लाख ४७ हजार ७८५ रुपयाचे कर्ज वाटप केले. गुंतवणूक ४ कोटी ४२ लाख ५५ हजार ८८८ रुपये असून या संस्थेचे एकूण ५६१ सभासद आहेत. प्रास्ताविका व अहवाल वाचन व्यवस्थापक एस. सी. तुगावे यांनी केले. सूत्रसंचालन बाळासाहेब गिरीबा तर आभार सहव्यवस्थापक सिद्धरामेश्वर स्वामी यांनी मानले. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील व्यापारी नागरी पतसंस्थेच्या सर्वसाधारण सभेच्या उद्घाटन प्रसंगी उमेश कारभारी, श्रीकांत मिणीयार, अशोक चव्हाण, अंबाजी बिराजदार, रवींद्र ख्याडे, शशिकांत बाबशेट्टी व अन्य.