ताज्या घडामोडी

मुरूम परिसरात ढगफुटी; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.

मुरूम, ता. उमरगा, ता. १० (प्रतिनिधी) : मुरूम व परिसरात झालेल्या पहाटे तीन ते सहा च्या दरम्यान बुधवारी (ता. १०) रोजी ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ढगफुटीमुळे सोयाबीन, तूर, उडीद व ऊस पिके पाण्यात बुडाली असून अनेक शेतकऱ्यांचे शेतबांध फुटून सुपीक माती वाहून गेली आहे. या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या परिसरातील मुरूम, अंबरनगर, फुलसिंग नगर, आचार्य तांडा, इंगोले तांडा, तुगाव, बेळंब आदी गावातील शेत पिकांचे नुकसान झाले. या संदर्भात भाजप मुरूम मंडळाच्या वतीने तहसील कार्यालयात निवेदन नायब तहसीलदार भीमाशंकर बेरुळे व कृषी कार्यालयात कृषी अधिकारी रीतापुरे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर भाजप मुरूम मंडळ अध्यक्ष निरजानंद अंबर, साईराज टाचले, सुनिल शिंदे, श्रीकांत बेंडकाळे, सुरेश शेळके, रामकृष्ण अंबर, विकास देडे व भाजप कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. फोटो ओळ : मुरूम, ता उमरगा येथील परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या संदर्भात कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देताना कार्यकर्ते व अन्य.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??