ताज्या घडामोडी

श्रीरामनगर शिवसेना शाखा पुरस्कृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने घरगुती गणेश दर्शन स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

या वर्षी श्रीरामनगर शिवसेना शाखा पुरस्कृत सार्वजनिक गणेशोत्सवनिमित्त *घरगुती गणेश दर्शन स्पर्धा* आयोजित करण्यात होती.या स्पर्धेत श्रीरामनगर सेक्शन २८ व २९ मधील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उस्फूर्त प्रतिसाद दिला.या स्पर्धेसाठी प्रा.डॉ.प्रकाश माळी व निखिल पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.या घरगुती गणेश दर्शन स्पर्धेतील विजेते….
◆सोहम पाटील: प्रथम
◆हर्षल शिंदे: द्वितीय
◆अनुपकुमार लिमजे: तृतीय
◆रुपाली सोनवणे: उत्तेजनार्थ
◆गौरी पाटील: उत्तेजनार्थ
स्पर्धेतील सर्व विजेत्यांना विभाग प्रमुख बापू सावंत,विभाग संघटक निवृत्ती पाटील,उपविभाग प्रमुख प्रा.डॉ.प्रकाश माळी,शाखा प्रमुख निखिल पाटील,उपशाखा प्रमुख रविंद्र चौधरी व कैलास जैन सर यांच्या हस्ते आकर्षक स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अक्षय राणे,संकेत महाजन,प्रथमेश राणे,महेश विसपुते,जयेश महाजन,दिपक नेमाडे,संदीप कोळी,राहुल जैन व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??