ताज्या घडामोडी

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात जेवढे आई आणि बाबा ना महत्त्व आहे तितकेच महत्व गुरुला

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात जेवढे आई आणि बाबा ना महत्त्व आहे तितकेच महत्व गुरुला देखील आहे। असे म्हणतात की “गुरु बिन कोण बतावे बाट”। गुरु शिवाय जीवन म्हणजे पाण्याशिवाय जीवन होय.

स्कंद पुराणात (गुरुगीता) मध्ये गुरूचा महिमा खूप सुंदर सांगितला आहे .
” गुकारस्त्व न्धकार: स्याद, रुकार स्तेज उच्च्ते !अज्ञान ग्रासक ब्रम्ह, गुरुदेव न संशय: !”
गु शब्दाचा अर्थ अंधकार आहे , रु चा अर्थ तेज म्हणजेच अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करणारा तेज स्वरूप ब्रम्ह “गुरु ” आहे . यात काहीही शंका नाही कि यापेक्षा सुंदर गुरूची व्याख्या होऊ शकते.

आजच्या आधुनिक युगातही गुरुचे स्तन तितकेच महत्वपूर्ण आहे जितके आधी होते , फक्त शिक्षकदिन साजरा करण्याच्या पद्धती बदललेल्या आहेत.

असे म्हणतात कि जगातील सर्वात कठीण कामे दोन असतात. एक म्हणजे आपल्या डोक्यातील दुसऱ्याच्या डोक्यात उतरवणे आणि दुसरे म्हणजे दुसऱ्याच्या खिशातील पैसा आपल्या खिशात आणणे . पहिले काम करता येणाऱ्याला शिक्षक म्हणतात तर दुसरे काम यशस्वीपणे करता येणारा व्यापारी असतो. शिक्षकाचे हे काम त्यासाठी अधिक महत्वाचे आहे कि पैसा कसा मिळवायचा हे सांगत असताना , जगायचे कसे आणि कशासाठी ? हे हि सांगून जातात. माझ्या मते आपल्याला ज्यांच्या कडून शिकायला आणि जगायचे कसे आणि कशासाठी हि शिकवण मिळते ती व्यक्ती सजीव असो कि निर्जीव वस्तू ती आपला गुरूच असते. जसे कि समस्या कितीही येवो , आपण आपला मार्ग बदलून पुढे जात राहावे, हे सारीतेपासून (नदी) , तर कुणी कितीही बोलो आपण आपला धर्म सोडू नये हे सूर्यापासून शिकायला मिळते.

प्रत्येकाच्या जीवनातील पहिला गुरु कोण असेल तर तो म्हणजे आपली आई ! गुरूंचे केवळ शब्दही काही वेळेस मोठी हिमत देऊन जातात , कुसुमाग्रजांनी त्यांच्या कणा कवितेत खूप सुंदर सांगितले आहे , ” पाठीवरती हात ठेऊन नुसते लढा म्हणा.”

उत्तम शिक्षक कसा असतो याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थ्यामधील. एक दहावीत शिकणारा विद्याथी त्याला जुडो शिकायचे खूप इच्छा असते , पण त्याच वेळी एका अपघात्त त्याचा डावा हात जातो. नि त्याचे जुडो शिकण्याचे स्वप्न स्वप्नच राहते . हि बातमी त्याच्या कोच ला कळते . आणि ते त्याच्या पालकांबरोबर त्याला बोलून घेतात आणि पालकांची परवानगी माघातात कि मला याला जुडो शिकवायचे आहे , अश्या वेळी सगळ्यांनाच धक्का बसतो कि हे शिक्षक असे काय म्हणतात. शेवटी ते कोच परवानगी घेतात आणि, त्याला जुडो चा एकच डाव वर्षभर शिकवतात . तो विद्यार्थी त्यांना विचारतो कि सर तुम्ही मला वर्षभर एकच डाव शिकवला आहे , मी स्पर्धेत भाग कसा घेणार आणि जिंकणार ? सर त्याला म्हणतात मी जे शिकवले आहे तेच तू करत राहा. आणि एक दिवस आंतरराष्टीय स्पर्धेत ते त्याला घेऊन जातात , तिथे तो प्रत्येक फेरीमध्ये जिंकत जातो , हे त्यालाही कळत नाही कि कसे , शेवटी अंतिम फेरीमधेही त्याचा विजय होतो …… सर्वांनाच आश्चर्य वाटते , तेव्हा एक पत्रकार त्याच्या कोच जवळ येतो आणि त्यांना विचारतो कि हे कसे शक्य झाले …. तेव्हा सर सांगतात कि , जुडो मध्ये तो जो डाव खेळला आहे त्यामध्ये प्रती स्पर्ध्याला समोरच्या व्यक्तीच्या डाव्या खांद्यावर हात ठेवायचा असतो , आणि याचा डावा हात अपघातात गेला . त्याच्या कामजोरीलाच मी त्याचे हत्यार बनवले … यामुळे तो अजिंक्य (Invincible) आहे. असे असतात गुरु जे विद्यार्थ्यामधील गुण आणि अवगुण ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन देत असतात.

शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस. आज आपल्याला घडविणाऱ्या एक तरी शिक्षकाला आठवून मनोभावे वंदन करा. शिक्षक दिनाच्या लाख शुभेच्छा!!!

डॉ. रिता मदनलाल शेटीया लेखिका अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका आहेत.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??