महात्मा फुले विद्यालय अंतरी बुद्रुक येथे माती शिल्प कार्यशाळा

शिराळा प्रतिनिधी
अंतरी बुद्रुक महात्मा फुले शिक्षण संस्था इस्लामपूरचे महात्मा फुले विद्यालय व जुनिअर कॉलेज अंत्री बुद्रुक येथे विद्यार्थ्यांमध्ये हस्त कौशल्य,सौंदर्यदृष्टी विकसित करणे व शेतातील नैसर्गिक मातीचा वापर करून पर्यावरण पूरक कलेचे महत्त्व पटवून देणे या उद्देशाने विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.प्रशांत कदम सर यांच्या संकल्पनेतून बेंदूर तसेच गौरी-गणपती सणाचे औचित्य साधून माती शिल्प कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.या कार्यशाळेसाठी विद्यार्थ्यांना सागाव येथील युवा मूर्तिकार पार्थ कुंभार,सोहम कुंभार,सुशांत कुंभार यांचे कृतीयुक्त उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले यातून इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या अनेक विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने छोट्या-छोट्या गणेशमूर्ती तसेच बैल व इतर प्राणी यांचे सुंदर शिल्प तयार करून स्वनिर्मितीचा आनंद लुटलाकार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका सौ.एस एन कुंभार यांनी विशेष प्रयत्न केले.ज्येष्ठ शिक्षक श्री एम व्ही माने,व्ही बी चौगुले यांनी मार्गदर्शक युवा मूर्तिकारांचा सत्कार केला व सुंदर मूर्ती बनवणाऱ्या विद्यार्थ्यांच कौतुक केले यावेळी श्री.डी व्ही खोत,एम एस पाटसुते सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते कार्यशाळेचे आभार श्री एस एल पाटील यांनी मानले.