कामेरी व इटकरे येथे संस्थामाता सुशिलदेवी साळुंखे जयंती व विद्यार्थी शिक्षक दिन उत्साहात साजरा

इस्लामपूर / प्रतिनिधी
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे विद्यालय ,मा. छगनबापू पाटील गर्ल्स हायस्कूल कामेरी व भाग शाळा इटकरे येथे संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली . प्रारंभी इटकरे येथे मुख्याध्यापक दिलीप चरणे
कामेरी येथे प्रभारी मुख्याध्यापिका ए.डी पेडणेकर यांचे हस्ते व प्रभारी पर्यवेक्षक यू.बी जाधव, सौ.एस.आर.यादव यांचे प्रमुख उपस्थितीत संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलता मुख्याध्यापक दिलीप चरणे यांनी शिक्षणाबरोबरच संस्कार हे सुद्धा महत्त्वाचे आहेत आणि हे संस्कार फक्त आणि फक्त ज्ञान मंदिरातच मिळतात असे मत व्यक्त केले.त्यानंतर कामेरी येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थी विद्यार्थिनी विद्यार्थी शिक्षक दिन साजरा केला.यावेळी इटकरे येथे ए.डी दुधारे.एम.के खतीब , एस. व्ही. सदलगे , धनंजय पाटोळे संदीप नांगरे कामेरी येथे सौ एस एम पाटील, किरण पवार ,सविता जानकर ,राजेंद्र जे, माणिक माने , सर्जेराव जगताप सर्जेराव अनुशे तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या भाषणातून संस्था माता यांच्या त्यागाचा आढावा घेतला. यानंतर त्यांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा व शिक्षण घेत असताना या संस्थामाता यांच्या त्यागमय जीवन, शैक्षणिक कार्यातील योगदान आणि प्रेरणादायी विचारांची उजळणी करण्यात आली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एस व्ही सदलगे यानि केले तर अर्जुन दुधारे यांनी आभार मानले