ताज्या घडामोडी

कामेरी व इटकरे येथे डॉ.बापूजी साळुंखे यांना अभिवादन

38 वा स्मृतिदिन उत्साहात साजरा
इस्लामपूर /प्रतिनिधी
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित कामेरी (ता. वाळवा) येथील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे विद्यालय व माननीय छगनबापू पाटील गर्ल्स हायस्कूल येथे शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांची 38 वी पुण्यतिथी विविध उपक्रमानी मा. मुख्याध्यापक श्री दिलीपराव चरणे व गर्ल्स हायस्कुलच्या मा. प्रभारी मुख्याध्यापिका सौ. अनुराराधा पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाली.
शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या
प्रतिमेचे पूजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री एस. आर. पाटील सर, गर्ल्स हायस्कूलच्या प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती अनुराधा पेडणेकर, ज्येष्ठ शिक्षक श्री उमेश जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले.
डॉ. बापूजींच्या प्रतिमेची पालखी मधून लेझीम व ताशाच्या गजरामध्ये गावांतील मुख्य मार्गावरून प्रभात फेरी झाली. बऱ्याच पालकांनी पालखीचे पूजन व बापूजींच्या प्रतिमेची आरती केली. विद्यार्थ्यांनी मोठ्या जल्लोषात अमर रहे अमर रहे, डॉक्टर बापूजी साळुंखे अमर रहे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा विजय असो या घोषणा विद्यार्थ्यांनी सुद्धा उत्साहात दिल्या.
यावेळी सर्व गुरुदेव कार्यकर्ते सौ. सुवर्णा यादव, श्री धनंजय पाटोळे, सौ. समक्षा पाटील, श्री हर्षवर्धन साळुंखे, श्री पी. डी. कांबळे, किरण पवार, सविता जानकर, कर्मचारी श्री राजू जेडगे, श्री माणिक माने, सर्व विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते‌.
लोकमत न्यूज नेटवर्क कामेरी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे विद्यालय कामेरी भाग शाळा इटकरे येथे शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांचा 38 वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. प्रथमता विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक मा. ए डी दुधारे एम.के. खतीब यांच्या हस्ते बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली
सदलगे एस. व्ही.यांनी बापूजी साळुंखे यांचा जीवनपट विद्यार्थ्यांना अवगत केला त्याचबरोबर गावातून विद्यार्थ्यांनी सवाद्य प्रभात फेरी काढण्यात आली. इटकरे ग्रामपंचायत येथे सरपंच संपत कांबळे यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयामध्ये प्रतिमापूजन घेण्यात आले. या कार्यक्रमास आपल्या विद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते शिक्षकेतर कर्मचारी श्री नांगरे मामा, सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??