ताज्या घडामोडी

प्रांताधिकारी नितीन मुंडावरे यांच्या हस्ते गांधली आणि मंगरूळ येथील समाधान शिबिराचे उद्घाटन!! बालविवाह मुक्त भारत अभियान आधार संस्थेचा सहभाग

अमळनेर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अमळनेर गांधली आणि मंगरूळ येथे दिनांक 04/08/2025 रोजी सर्व शासकीय योजना माहिती All Government Schemes प्रदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन प्रांत अधिकारी नितीन मुंडावरे यांच्या हस्ते करण्यात आले.आधार संस्था,जस्ट राईट फॉर चिल्ड्रेन प्रकल्पाचा प्रदर्शन स्टॉल द्वारे नागरिकांना बालविवाह मुक्त भारत अभियान विषयी माहिती देण्यात आली.नागरिकांना बालविवाह मुक्त भारत करण्याचे आवाहन केले .
प्रांत अधिकारी नितीनकुमार मुंडावरे, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, नायब तहसीलदार धमके ,कृषी विभाग अधिकारी, पंचायत समिती,आरोग्य विभाग,पोलिस , विधी सहाय्यक प्रशासन,महिला बचत गट , शासकीय कर्मचारी, ग्रामसेवक, सरपंच, उपस्थित राहून योजने विषयी मार्गदर्शन करत आहेत.

आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर जिल्हा जळगाव ,
जस्ट राईट फॉर चिल्ड्रेन टीम मेंबर अध्यक्ष डॉ भारती पाटील, संचालक रेणू प्रसाद , प्रकल्प समन्वयक आनंद पगारे, मोहिनी धनगर, राकेश महाजन,ज्ञानेश्वरी पाटील,समाधान अहिरे, ऊर्जिता शिसोदे भावेश मराठे यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??