शिराळ्यात नागपंचमीत जिवंत नाग प्रदर्शनास परवानगी… शिक्षण व धर्मशिक्षणाच्या अनुषंगिक २१ जणांना परवानगी.

आमदार सत्यजीत देशमुख.
शिराळा प्रतिनिधी
शिराळ्यात नागपंचमी दिवशी धर्मशिक्षण व शिक्षणाच्या अनुषंगिक २१ जणांना परवानगी दिली असल्याची माहिती आमदार सत्यजीत देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे यामध्ये मोठे योगदान आहे,असे आ.सत्यजीत देशमुख यावेळी म्हणाले.केंद्रीय मंत्री अमित शहा,भूपेंद्र यादव,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,खास. धैर्यशील माने,वनमंत्री गणेश नाईक या सर्वांची यात मोलाची भूमिका आहे.
शिराळकरांनी कायद्याचे पालन करावे.शिराळा जागतिक पर्यटन स्थळ होईल.सर्वांनी रुढी परंपरा जतन कराव्यात.केंद्र आणि राज्याचा हा महत्वपूर्ण निर्णय आहे.लोकशिक्षणाच्या दृष्टीने हा महत्वाचा निर्णय आहे.नागांची माहिती देणे,लोकशिक्षण देणे हा मूळ हेतू आहे.शिराळकरांनी पास धारक, वन,महसूल,पोलिस प्रशासनास सहकार्य करावे.
यावेळी रणजितसिंह नाईक,सम्राटसिंह शिंदे,अभिजित यादव,कुलदीप निकम,हणमंतबापू पाटील,शिराळ्यात नागमंडळांचे कार्यकर्ते,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.एकमात्र निश्चित आमदार सत्यजीत देशमुख यांच्या या मास्टर स्ट्रोकने सर्व काही जिंकले आहे.