ताज्या घडामोडी

बांदोडकर विज्ञान महाविद्यालय व ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीर संपन्न..

क्षयमुक्त ठाणे भयमुक्त ठाणे या निर्धाराने ठाणे येथील विद्या प्रसारक मंडळाचे बांदोडकर विज्ञान महाविद्यालय(स्वायत्त)आणि सार्वजनिक आरोग्य विभाग ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने व ऑस्कर हॉस्पिटल तसेच लायन्स क्लब कांजूरविक्रोळी यांच्या सहकार्याने महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.विंदा मांजरमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्टाफ रूममध्ये विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात रक्तदाब,शुगर चाचणी,रक्त चाचणी,क्षयरोग चाचणी,एक्स रे व ईसीजी हे सर्व मोफत करण्यात आले.या सोबतच धनुर्वात लस व आरोग्यविषयक सल्ला देखील मोफत देण्यात आला.शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.विंदा मांजरमकर,ठाणे महापालिकेचे समन्वयक संजय पवार,लायन्स क्लबचे अध्यक्ष चंद्रकांत हावरे,खजिनदार पी.एन.सिंग व लायन अशोक जाधव यांच्या शुभहस्ते तसेच एनसीसी कॅप्टन बिपीन धुमाळे, जिमखाना समन्वयक डॉ.भालचंद्र मांडलेकर व सेवानिवृत्त प्रा.प्रकाश माळी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.या आरोग्य शिबिरास उपप्राचार्या प्रा.प्रीती जांभुळकर,पर्यवेक्षक प्रा.बालाजी घुगे,राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ.सायली दप्तरदार व ग्रंथपाल कादंबरी मांजरेकर यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले.शिबीर यशस्वी होण्यासाठी ठाणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.प्रसाद पाटील,डॉ.मोनिका साळुंके व आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी तसेच ऑस्कर हॉस्पिटलचे डॉ.यश मोरे,संदीप खापरे,विजय पारवे व ऑस्करची संपूर्ण टीम,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.जवळपास ६०० विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??