शिक्षण म्हणजे भविष्य घडवण्याचे साधन — प्रदीपकुमार कुडाळकर

शिराळा प्रतिनिधी
“संस्कृती क्लासेस” या नावाजलेल्या क्लासेसच्या वतीने स्कॉलरशिप व एन.एम.एम.एस. परीक्षेत उज्वल यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभात शिक्षणाधिकारी (योजना, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग) श्री. प्रदीपकुमार कुडाळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी मार्गदर्शन करताना कुडाळकर म्हणाले, “शिक्षण हे केवळ गुण मिळवण्यासाठी नसून, तेच आपल्या भविष्याची घडण घडवते. सरकारी योजना म्हणजे विद्यार्थ्यांसाठी उघडलेली सुवर्णसंधी आहेत. त्यांचा लाभ घेतल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मोठ्या संधी प्राप्त होऊ शकतात.”
ते पुढे म्हणाले की, “एन.एम.एम.एस. परीक्षा ही केवळ आर्थिक सहाय्य पुरवणारी योजना नसून, विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या दिशेने नेणारा महत्त्वाचा टप्पा आहे. संस्कृती क्लासेस सारख्या संस्था ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन देत आहेत, हे कौतुकास्पद आहे.”या कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. पालक आणि शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.संस्कृती क्लासेस च्या मार्गदर्शिका सौ.कोमल नाईकडे यांनी सातत्य, शिस्त आणि योग्य दिशेने मार्गदर्शन केलेने यश मिळाल्याचे सांगितले“संस्कृती क्लासेस” मुळे वेळेवर मिळालेले योग्य मार्गदर्शनच यशाचे खरे कारण असल्याचे विद्यार्थ्यांनी मनोगतात नमूद केले.कार्यक्रमाचा समारोप जल्लोषात झाला. विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होवो, अशा शुभेच्छा देत सर्व मान्यवरांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.