ताज्या घडामोडी

ल.कि.विद्यामंदिरात नागपंचमी सणानिमित्त पथनाट्यातून सापाविषयी प्रबोधन

दिनेश कांबळे:पलूस प्रतिनिधी

पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या, लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज पलूस प्रशालेत नागपंचमी या सणानिमित्त नागपंचमी श्रद्धा-अंधश्रद्धा, समज- गैरसमज यावर आधारित केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय हरित सेना विभागाच्या वतीने प्रबोधनात्मक पथनाट्य स्वरूपात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख हिम्मतराव मलमे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.त्यानंतर राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी नागपंचमी सणाच्या अनुषंगाने सर्प या प्राण्याविषयी समज- गैरसमज,श्रद्धा-अंधश्रद्धा यावर आधारित ‘सर्पावर दया, पर्यावरणावर माया’ प्रबोधनात्मक पथनाट्य सादर केले.यावेळी पर्यवेक्षक दिनेश बडगुजर यांनी नागपंचमी सणानिमित्त विद्यार्थ्यांना सुंदर माहिती सांगितली.या कार्यक्रमाला पर्यवेक्षक पुनाजी साबळे सर,सतीश पाटील ,पृथ्वीराज पाटील ,शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्रा. डॉ.खजूरकर उपस्थित होते.राष्ट्रीय हरित सेना विभागातील प्रांजल कुंभार ,आराध्या पवार, पूर्वा धोत्रे ,समीक्षा शिंदे, अंजली इरकर ,समीक्षा जाधव ,सई पडुळे,आदित्य जाधव, रैहान मुल्ला ,आदित्य गवळी ,आदित्य चव्हाण, आदित्य जाधव, श्रीराज दळवाई ,हर्ष येसुगडे या विद्यार्थी विद्यार्थिंनीनी नाट्यात भाग घेतला. प्रशालेतील सर्व अध्यापक बंधू भगिंनी व विद्यार्थी विद्यार्थिंनी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशालेचे प्राचार्य अनिल सावंत सर व उपमुख्याध्यापक रमेश कदम यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??