ताज्या घडामोडी
सतीश कोळी यांची मुख्याध्यापक पदी नियुक्ती

इस्लामपूर /प्रतिनिधी
वाटेगाव (ता. वाळवा), जि.सांगली येथील सतिश बाबुराव कोळी यांची श्री. नाईकबा विद्यालय, बनपुरी ता. पाटण, जि. सातारा येथे मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सतीश कोळी यांनी या पूर्वी न्यू इंग्लिश स्कूल, जोहे;राजेंद्र हायस्कूल, अंबप; श्री. पाराशर हायस्कूल, पारगाव; पृथ्वीराज कपूर मेमोरीयल हायस्कूल, लोणीकाळभोर; आणि कै. सुकुमार नागेशकर हायस्कूल, वारुळ येथे उल्लेखनीय अध्यापन कार्य केले आहे. त्यांची नियुक्ती स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरचे कार्याध्यक्ष अभयकुमारजी साळुंखे, सचिव शुभांगी गावडे,सी.इ. ओ कौस्तुभ गावडे व विद्या समिती प्रमुख श्रीराम साळुंखे यांच्या मार्गदर्शनाने झाली. त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन होत आहे.