तासगाव तालुक्यातील खाजगी सावकारा विरोधात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एल्गार

न्यायालयाने सावकारावर गुन्हा दाखल करण्याचे दिले आदेश
प्रतिनिधी:- बापूसाहेब कांबळे
शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे सांगली जिल्ह्याचे नेते प्रदीप माने पाटील व तासगाव शहराचे नेते विशाल शिंदे व अँडव्होकेट अमित शिंदे यांनी सावकारकी विरोधात एल्गार केला आहे,तासगाव तालुक्यातील पेड येथील सहा शेतकऱ्यांनी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाच्या बदल्यात व्याजदर व ती रक्कम देऊनही सावकाराने फसवणूक करून या शेतकऱ्यांची जमीन नावावर करून घेतल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मांजर्डे येथील सावकार बाळासाहेब उर्फ बाळकृष्ण उर्फ बाळासाहेब भगवान भगत याच्या विरोधात तासगाव पोलिसात सावकारी व फसवणुकीची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अशी माहिती पत्रकार परिषदेत सांगलीचे अँडव्होकेट अमित शिंदे व सांगली जिल्ह्याचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते प्रदीप माने पाटील व तासगाव शहराचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे विशाल शिंदे यांनी माहिती दिली, तदनंतर प्रदीप माने पाटील यांनी सांगितलेकी तासगाव तालुक्यात व सांगली जिल्ह्यात कुठेही सावकारकी सुरू असेल तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या तासगावं शहरातील कार्यालयाशी संपर्क साधा,किंवा फोनवरून संपर्क साधा, सावकारांना कोपरापासून ढोपरापर्यत सोलून काढतो व ज्या त्या पोलीस स्टेशनमध्ये सावकारावर गुन्हे दाखल करतो, फक्त मला बाजू समजून सांगा ,तात्काळ सावकारांच्या मुसक्या आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आवळतो.
पत्रकार परिषदेमध्ये प्रदीप माने पाटील यांनी सांगितले की तासगाव तालुक्यातील व सांगली जिल्ह्यातील गोरगरीब तसेच शेतकरी हे सावकाराकडून महिना 15 ते 20 टक्क्यांनी कर्ज घेतात परंतु सावकार तगादा लावतात, ते भरणे शक्य झाले नसल्याने किंवा कर्ज भरणा जरा थांबले की सावकार जमिनी व गाड्या घेऊन जातात, व व्याजावर व्याज चक्रवाढ व्याज असे घेतात, अशा सावकारांना शिवसेना स्टाईलने कोपरापासून ढोपरापर्यंत सोलुन काढणार, शेतकऱ्यांच्यासाठी गुन्हे दाखल झाले तरी चालतील.शिवसेनेचे तासगाव शहरचे विशाल शिंदे यांनी सांगितले की झालेल्या घटनेबाबत फोनवरून आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांना फोनवरून कल्पना दिली आहे, तात्काळ त्यांनी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना फोन करून सांगितले की न्यायालयाने सांगितले आहे त्याप्रमाणे गुन्हे सावकारावर दाखल करा व कोणालाही सोडू नका, जिल्ह्यातील सावकारावर कडक कारवाई करा.