ताज्या घडामोडी

शिराळा तांदूळ हा ब्रँड झाला पाहिजे. भात रोपांचे बीज दालन होणे गरजेचे. बांबू लागवड बाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती आवश्यक. – आमदार सत्यजित देशमुख.

शिराळा प्रतिनिधी

शिराळा तहसिल कार्यालय येथे डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने शाश्वत शेती दिन व महसूल सप्ताह सांगता समारंभ, बांबू लागवड तंत्रज्ञान कार्यशाळा व बांबू पासून बनविलेल्या वस्तू चे प्रदर्शन व महिला बचत गटांनी निर्मिती केलेल्या वस्तू चे प्रदर्शन संपन्न झाले. या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी तहसीलदार शामला खोत पाटील, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, कृषी अधिकारी किरण पवार, अरुण बेंद्रे, अमित मोरे, अनुलोम चे शरद सांळूखे , कपिल माळवदे, प्रशांत कुंभार सह महसूल, कृषी विभागाचे अधिकारी,उपस्थित होते.

आमदार देशमुख म्हणाले, आपल्याकडे पर्जन्यमान जास्त असल्याने भात, ऊस ही नगदी पिके घेतली जातात. परंतु त्यांच्या उपपदार्थ निर्मिती साठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. जांभूळ, करवंदे आपल्याकडे मुबलक मिळतात. त्याच्या पासूनही लोणचे, जाम असे उपपदार्थ निर्मिती शक्य आहे. शहरी भागात या जंगली फळांना मागणी आहे परंतु तिथे ते मिळणे कठीण आहे. त्यासाठी आपल्याकडे असणाऱ्या मालापासून उत्पादन घेतल्यास आपल्या गरजा पूर्ण होतील.

ते म्हणाले, भविष्यात भात रोप बीज दालन उपलब्ध करण्याचा मानस आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या गाठीभेटी घ्या, त्यांच्या अडचणी दूर करा, त्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करा.गुणवत्ता प्रचुर बीज तयार करून शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करावी, त्याच बरोबर बांबू लागवड तंत्रज्ञान अवगत करून शेतकऱ्यांना त्या शेतीकडे वळवावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी आमदार देशमुख यांनी बचत गटातील महिलांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.स्वागत नायब तहसीलदार राजेंद्र पाटील यांनी केले तर आभार तालुका कृषी अधिकारी किरण पवार यांनी मानले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??