ताज्या घडामोडी

डागा हॉस्पिटलकडून मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न शंभरपेक्षा अधिक रुग्णांनी घेतला लाभ

Spread the love

मुरूम, ता. उमरगा, ता. ४ (प्रतिनिधी) : येथील डागा हॉस्पिटलच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबीर शनिवारी (ता. ४) रोजी संपन्न झाले. डॉ. राधाकृष्ण डागा यांच्या आरोग्य सेवेतील ५१ वर्ष व डॉ. नितीन डागा यांच्या आरोग्य सेवेतील २१ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आहे. या शिबिराचे उद्घाटन रोटरी क्लब मुरूम सिटीचे अध्यक्ष कमलाकर मोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रोटरीचे सचिव सुनिल राठोड, रोटरीचे माजी अध्यक्ष गोविंद पाटील, प्रा. डॉ. महेश मोटे, डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, कोषाध्यक्ष प्रकाश रोडगे, डॉ. शिवराज हाळ्ळे, डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. महेश स्वामी, संतोष कांबळे, कलाप्पा पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. धाराशिव येथील अजमेरा रोटरी नेत्र रुग्णालयाच्या वतीने डॉ. स्नेहा पाटील, डॉ. शिवरुद्र इसाके यांनी रुग्णांची तपासणी करून योग्य ते मार्गदर्शन केले. डॉ. शिल्पा डागा, डॉ. अनिश डागा, सुदर्शन डागा, प्रविण डागा यांनी पुढाकार घेतला. या नेत्र शिबिराचा शहर व परिसरातील शंभर पेक्षा अधिक रुग्णांनी लाभ घेतला. फोटो ओळ : मुरुम, ता. उमरगा येथील डागा हॉस्पिटलमध्ये रुग्णांची तपासणी करताना डॉ. स्नेहा पाटील, शिवरुद्र इसाके, कमलाकर मोटे, राधाकृष्ण डागा, नितीन डागा, सुनिल राठोड, आप्पासाहेब सूर्यवंशी, महेश मोटे व अन्य.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!