ताज्या घडामोडी

शिराळा येथे कामगार दिनानिमित्त कामगार स्नेह मेळावा व पुरस्कार सोहळा संपन्न.

Spread the love

शिराळा तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून अंगमेहनती कष्टकरी तसेच सर्व क्षेत्रातील संघटित असंघटित कामगारांच्या साठी मोरणाराज कष्टकरी श्रमिक कामगार असोसिएशन काम करत आहे. या अनुषंगाने कामगारांसाठी असोसिएशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात. यावर्षी मोरणाराज कामगार असोसिएशन व क्रांतिसूर्य सोशल फाऊंडेशन यांचे वतीने कामगार दिनानिमित्त कामगार स्नेह मेळावा व सन्मान सोहळा आयोजित केला.
यावेळी मोरणाराज कामगार असोसिएशनच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रातून गोरगरीब सर्वसामान्य गरजू लोकांसाठी व त्यांच्या प्रश्नांवर निःस्वार्थ काम करणाऱ्या लोकांना यावर्षीचा राज्यस्तरीय पुरस्कार सचिन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर चे डॉ.विकास बामणे यांच्या हस्ते देण्यायात आला.
राज्यस्तरीय आदर्श शिक्षक प्रा. डॉ. सुरज चौगुले सर, आदर्श वैद्यकीय पुरस्कार डॉ. राहुल कदम व डॉ.पूनम कदम, उत्कृष्ट संपादक प्रा. डॉ. दस्तगीर पठाण यांना तर सामाजिक कार्यकर्त्या सौ. मंगल पाटील यांना देऊन गौरवण्यात आले.
आरोग्य तपासणी व रक्त तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले याचा शेकडो कामगार बंधू भगिनींनी लाभ घेतला.
यावेळी पुरस्कार दिल्याबद्दल सर्वांनी कामगार अससोसिएशनच्या पदाधिकारी यांचे आभार मानले.हा एक पुरस्कार नसून आजपर्यंत केलेल्या कामाची पोच आहे व इथून पुढेही काम करण्यासाठी प्रेरणा देणार आहे.प्रा. डॉ. चौगुले यांनी कामगार असोसिएशन कष्टकरी कामगारांबद्दल करत असलेल्या निस्वार्थ कामाबद्दल कौतुक केले.व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. डॉ. राहुल कदम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. विकास बामणे यांनी कामगार बंधू-भगिनींना समजेल अशा रांगड्या भाषेत कष्ट करून काम करत असताना शरीराची व हृदयाची घ्यावयाची काळजी, हृदयविकाराचा झटका आल्यावर घ्यावयाची काळजी याबद्दल सोप्या पद्धतीने माहिती दिली.
कार्यक्रमाची स्वागत व प्रस्तावना कामगार असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष मा. मारुती रोकडे यांनी केले. तर आभार क्रांतीसुर्य सोशल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मा. राजेंद्र देवकर यांनी केले. यावेळी मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष शिवाजी व हंबीरराव देशमुख आणि कामगार असोसिएशनचे शिवाजी कदम, रवींद्र यादव, अशोक सावंत,अमोल साठे,गजानन पवार, सुनील पाटील, झाकीर फकीर, कृष्णात पवार, चेतन पाटील, अक्षय थोरात, प्रियांका शिंदे, पुनम रोकडे, आर्कि.सारिका जगताप,संतोष कार्वेकर, सुनील जगताप, कमल गुरव, अनुसया पाटील, सुरेश पाटील,पंकज खोत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!