ताज्या घडामोडी

शिराळा शहरात स्वाभिमानीचा प्रचाराचा धडाका!

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

आज सकाळी युगपुरुष, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, शिराळा येथे आपल्या शिराळा शहरातील सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी, कामगार, युवक, विद्यार्थी, महिला मतदार बंधू-भगिनींच्या सर्वसमावेशक, सर्वांगीण‌ आणि शाश्वत विकासासाठी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून संकल्पपत्र जाहीर करण्यात आले. सुरुवातीला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सौरभ शेट्टी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर शिराळा शहरातून हालगीच्या कडकडाटात व फटाक्यांच्या आतषबाजीत पदयात्रा‌ काढण्यात आली. यावेळी प्रहारचे तालुका अध्यक्ष बंटी नांगरे- पाटील यांनी स्वागत केले. युवक क्रांतीचे निमंत्रक कैलास देसाई यांनी प्रास्ताविक केले.
संकल्पपत्र प्रकाशन सोहळ्यास आणि पदयात्रेस स्वाभिमानीचे सौरभ शेट्टी, प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष राम पाटील, तालुकाध्यक्ष मानसिंग पाटील, युवा आघाडी अध्यक्ष देवेंद्र धस, शिवलिंग शेटे, सर्वश्री बाबा पाटील, प्रहार तालुका अध्यक्ष रविंद्र पाटील, प्रकाश पाटील, फत्तेसिंग गायकवाड, ऋषीकेश घोडे पाटील, दिग्विजय पाटील, सुनिल रोकडे तसेच स्वाभिमानीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. *पदयात्रा तसेच पदयात्रेनंतर शिराळा शहरात राबविण्यात आलेल्या घर टू घर प्रचार मोहीमेस शिराळा शहरातील सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, श्रमकरी, वंचित, युवक, महिला मतदार बंधू-भगिनींनी उस्फूर्त प्रतिसाद देत राजू शेट्टी यांना पाठिंबा दर्शविला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!