ताज्या घडामोडी

रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा – डॉ.पांडुरंग फड

Spread the love

परळी शहरात गेली दोन वर्ष फड मल्टीस्पेशालिटी हाॅसपिटल अनगिनत रुग्णांनाची सेवा त्या मध्ये रोड अॅकसिडेंट अनेक हाडांचे फ्रँकचर तसेच छाती,डोके,व पोटाचे मार लागलेले अनेक पेंशंट तत्पर सेवेमुळे अनेकांचे प्राण वाचवले संभाजी नगर,लातुर,पुणे, मुंबई, दर्जाची सेवा परळी मध्ये फड हाॅसपिटल मुळे मिळत आहे.अदययावत मशिनरी व आपरेशन थिएटर उपलब्ध आहे.फिजोथेरपी उपलब्ध आहे.

काही माणसही फिनिक्स पक्षासारखी असतात! कितीही खडतर काळ आणि परिस्थिती असली तरीही; त्यावर मात करून आपले अस्तित्व उभे करतात. असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे धर्मापुरी सारख्या छोट्याशा गावातून आलेले आणि सद्यस्थितीत परळी जि.बीड येथील फड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ.पांडुरंग फड! डॉ.फड साहेबांचा इतिहास मोठा विस्मयकारक आहे! आई-वडील श्री गंगाधर-सौ.शारदा या सामान्य शेतकरी अल्प शिक्षित कुटुंबात आईने रामायण, महाभारत, ज्ञानोबा, तुकोबांचे वारकरी संस्कार आणि वडिलांनी छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतीराव-सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कृतीशील संतश्रेष्ठ श्री भगवानबाबा या महामानवांच्या विचारांचे संस्कार खोलवर रुजवले. याचा परिपाक असा झाली की; फड कुटुंबातील मुलं लहानपणापासूनच सुसंस्कारित झाली. घरी संतांचे विचार, भजन-पूजन याचा प्रभाव या लेकरांच्या जीवनावर पडला. गावातल्या शाळेतच ही मुलं चमकायला लागली! त्यात पांडुरंगचे तर सगळीकडेच नाव होऊ लागले. त्यामुळे वडिलांना आपली मुले शिकविण्याचा हुरुप येऊ लागला. त्यांनी मुलांच्या शिक्षणाकडे आणखीनच लक्ष द्यायला सुरु केले. लक्ष्मण व पांडुरंग आपल्या बुद्धीमतेच्या बळावर नवोदय विद्यालयाला लागले! फड कुटुंबियाचा आनंद गगनात मावेनासा झाला. आईचे नाव शारदा म्हणजेच अक्षरशः सरस्वती त्यांना प्रसन्न झाली! मुलाने घराचे नाव केले होते. लोकं या मुलांची उदाहरण द्यायला लागली. याचा परिणाम असा झाला की; पांडुरंग, भाऊ लक्ष्मण आणि सिद्धेश्वर जिद्दीला पेटली. पांडुरंग नवोदयला गेल्यावर या दोघा भावांनी आपला नावलौकिक कायम ठेवला. सगळीकडे गुणवत्तेचा दुष्काळ असतांना गंगाधरराव आणि शारदा या फड कुटुंबियातील त्रीमुर्तींनी आपल्या गुणवत्तेने संपूर्ण धर्मापुरी परिसरच काय संपूर्ण परळी तालुका आणि बीड जिल्हा गाजवून टाकला. या तीनही भावंडांच्या यशाची खबरबात परळीचे भाग्यविधाते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, बहुजनांची मुलुख मैदानी तोफ श्रीमान गोपिनाथरावजी मुंडे साहेबांना कळल्यावर त्यांनी श्री गंगाधरराव फड आणि त्यांच्या तीनही मुलांचे गुणवत्तेबद्दल कौतुक केले. त्यानंतर या मुलांनी पुन्हा मागे वळून पहिलेच नाही!
या सर्वच गोष्टी पुढे पुढे आणखीनच बहरत गेल्या. नवोदय विद्यालयातून पांडुरंग पुढे लातूर येथीळ नामांकित बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात शिकायला गेला. तिथेही त्याच्या गुणवत्तेचा डंका वाजत राहिला आणि पांडुरंगचा पुणे येथील एस.के. एन.एम.सी महाविद्यालयात एम.बी.बी.एस ला नंबर लागला. फड कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मोठा दादा गुणवत्तेच्या जोरावर मेडिकलला लागला याचा फायदा दोन्ही लहान भावांना झाला. लक्ष्मण आपल्या दोन्ही लहान भावांना पुढील शिक्षण, परीक्षा आणि सर्वच गोष्टींचे बारकाईने मार्गदर्शन केले. दोन्ही भावांना अजिबात खचू दिले नाही. शिक्षणातील वेगवेगळ्या गोष्टी सांगून वेळोवेळी मार्गदर्शन करत राहिला आणि त्याच्या मार्गदर्शन आणि आई-वडिलांच्या कष्टाला यश यायला लागले. अगोदर दोन नंबरचा भाऊ पांडुरंग आणि नंतर सिद्धेश्वर हे दोघेही भाऊ एम.बी.बी.एस. व बी.डी.एस.ला लागले.
आज डॉ.पांडुरंग फड साहेब, त्यांचे सर्वच बंधू आणि अंबाजोगाई रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भव्य-दिव्य, सर्वच सोयी-सुविधासह उभे असलेले फड हॉस्पिटल म्हणजे परळीतील नामांकित हॉस्पिटल पैकी एक आहे. डॉ.पांडुरंग फड साहेब केवळ MBBS शिक्षणावर थांबले नाहीत. पुढे त्यांना अनेक डिग्री खुणावत होत्या. त्यातूनच पुढे त्यांनी स्वतःच्या गुणवत्तेवर बेंगलोर येथून DNB सारखा वैद्यकीय क्षेत्रातील महत्वपूर्ण शिक्षण पूर्ण केले. याचा परिणाम म्हणजे डॉ.फड साहेबांना विविध ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली. त्यापैकी त्यांनी काही काळ शासकीय सेवेत घालवला; परंतु वैयक्तिक कारणामुळे शासकीय सेवेला रामराम केला आणि खाजगी क्षेत्रात काम करायचे ठरवले. त्या नंतर त्यांनी YCM हॉस्पिटल पुणे, आदित्य बिर्ला हॉस्पिटल पुणे, लटपटे हॉस्पिटल आदि ठिकाणी आपली सेवा दिली. मध्येच कोरोना सारखी महामारी आली. त्यातही डॉ.फड बंधू मागे हटले नाहीत. त्यांनी विविध ठिकाणी स्वतःचा जीव धोक्यात घालून कोविड सेंटरला आपली सेवा दिली. अत्यवस्थ रुग्ण बरे करण्यात त्यांना यश आले. हे सगळे सुरु असतांना डॉ.पांडुरंग फड साहेबांनी आपली सहचारिणी सुद्धा आपल्याच क्षत्रातील निवडून त्यांनी MBBS भूलतज्ञ असणाऱ्या डॉ.शुभांगी यांच्याशी विवाह केला. डॉ.पांडुरंग-सौ.डॉ.शुभांगी हे दोघेही प्रथितयश डॉक्टर आणि दुसरीकडे दोन्ही भाऊ लक्ष्मण आणि सिद्धेश्वर यांचेही शिक्षण पूर्ण झाले होते. त्यांनाही डॉ.लक्ष्मण-सौ.डॉ.साधना, डॉ.सिद्धेश्वर-सौ.डॉ.जयश्री अशा त्यांच्याच व्यवसायातील अर्धांगिनी मिळाल्यामुळे या एकाच घरातील सहा तज्ञ लोकांना बाहेर काम करण्याने समाधान मिळत नव्हते. अगोदरच डॉ.पांडुरंग हे महत्वकांक्षी असल्यामुळे त्यांना स्वतःचे हॉस्पिटल खुणावू लागले. “एकीचे बळ आणि मिळते फळ” या म्हणीप्रमाणे या तीन भावडांनी परळी येथील अंबाजोगाई रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक मोठी जागा खरेदी करून तिथे भव्य-दिव्य हॉस्पिटल उभारायचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. धर्मापुरीतील श्री गंगाधर-शारदा यांच्या एका छोट्याशा कुटुंबातून सुरु झालेला हा प्रवास आणि पांडुरंगने चिकाटीने केलेल्या प्रयत्नाला आज एवढे मोठे फळ लागले आहे. आई-वडिलांचे अपार कष्ट, शिक्षणावर नितांत श्रद्धा आणि मोठ्यांचे मार्गदर्शन याच्या बळावर आज फड कुटुंबातील तीनही भावंडे वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षित असून परळी येथे मोठे सुसज्ज, सर्व सोयी सुविधानिशी हॉस्पिटल उभे आहे!
आज या तीनही भावातील डॉ.पांडुरंग फड साहेबांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्यावर हा लेख लिहित असतांना त्यांचे ज्ञान, शिक्षण, पैसा आणि प्रतिष्ठा परळी आणि बीड जिल्हाच काय महाराष्ट्रातील सामान्य लोकांच्या कामी यावी. या सहाही यशस्वी, तज्ञ, सुज्ञ, वैद्यकीय क्षेत्रातील माझ्या बंधू-भगिनींनी आपल्या दवाखान्यात शरीक होणाऱ्या पेशंटची अवस्था पाहून त्याच्यावर उपचार करावेत. गोर-गरीब जनतेच्या अशीर्वादातूनच माणसं मोठी होत असतात. डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्र हे पहिल्यासारखे सेवा क्षेत्र राहिले नसून हे क्षेत्र काही प्रमाणात बदनाम होतांना पाहून मन व्यथित होते. तेंव्हा, श्रीमान डॉ.पांडुरंग फड आणि या सर्वच डॉक्टरांकडून लोकांची सेवाही व्हावी आणि त्यातून त्यांना मेवाही मिळावा! असे होणे म्हणजेच खऱ्या अर्थाने वाढदिवस साजरा करणे होय! आपल्याहातून उत्तरोत्तर उत्तम सेवा घडून माय-माती याचे ऋण फेडण्याची आपणाला पांडुरंग परमात्मा सदैव सदबुद्धी देवो हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन थांबतो! जय हिंद! जय भारत! जय महाराष्ट्र!

प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभाये
कै.रमेश वरपूडकर महाविद्यालय, सोनपेठ
जि. परभणी (महाराष्ट्र)
मो. 9158064068
(टीप: लेखक हे व्याख्याता, कवी, किर्तनकार, समीक्षक, योग-प्राणायाम प्रशिक्षक आहेत.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!