ताज्या घडामोडी

शिराळा येथे बिबट्याचा धूमाकूळ वनविभागाचे दुर्लक्ष… वनविभाग झोपेत.. नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

शिराळा येथे बिबट्याचा धूमाकूळ सुरू असून बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र दररोज सुरू आहे. वनविभागाने मात्र गांधारीची भूमिका घेतली आहे. बिबट्याचा हल्ला झाल्यानंतर वन विभागाच्या कडून पंचनामे होत नाहीत. त्यामुळे वनविभागाने याची दखल घेतली नाही तर शिराळकरांचा उद्रेक होईल असे प्रतिपादन शिराळा पंचायत समिती माजी सभापती, प. पू स्वामी विवेकानंद सेवाश्रम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड भगतसिंग नाईक यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी बोलताना अॅड भगतसिंग नाईक पुढे म्हणाले की मोरणा धरण रोड, औढी रोड पड परिसर, करमाळे रोड, येथे बिबट्याचा वावर वाढला असून दररोज पाळीव कुत्री, शेळी, मेंढी वर हल्ला होत आहे वनविभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. ज्याठिकाणी हल्ले झाले तेथे वनविभाग भेटी देत नाही पंचनामे करत नाही. त्यामुळे नागरिकांच्या वनविभागाच्या कारभारा बद्दल साशंकता निर्माण झाली आहे. वनविभागाला आपल्या कामाची जाणीव नाही. या वेळी बोलताना ते म्हणाले पुढे म्हणाले की काल रात्री औढी रोड वरील पड परिसरात पृथ्वीसिंग नाईक यांच्या फॉर्म हाऊस मधील जर्मन शेफर्ड कुत्र्या वर बिबट्याने हल्ला करून कुत्र्यांस ठार मारले. वन विभागास कळवूनही पहाणी केली नाही अथवा पंचनामे केले नाहीत. तालुक्यात रिळे येथील गव्यांचा मृत्यू झाला, वनविभाग तपासात अपयशी झाले, चव्हाणवाडी येथे बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला हे वनविभाग शोधू शकले नाही .एक वन विभागाचे अधिकारी निलंबित करण्यात आले. वनविभागाने वरिष्ठ अधिकारी समोर , माजी आमदार समोर तहसीलदार कार्यालयात तालुक्यातील शेतकरी यांनी वन कर्मचाऱ्यांनी पंचनामे करण्याचे वेळी पैसे मागणी करतात असा आरोप केला होता. वन विभागाच्या कारभारा विषयी तक्रारी मांडल्या होत्या. शिराळा येथे आलेले नवीन अधिकारी नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत नाहीत. त्यामुळे वनविभागाने याची लवकरच दखल घ्यावी अन्यथा शिराळकरांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!