ताज्या घडामोडी

पालकाच्या पसंतीला उतरलेले यश अकॅडमी अंतर्गत उन्हाळी कॅम्प प्राचार्य डॉ अशोकराव ढगे

Spread the love

यश अकॅडमी समर कॅम्प चा शुभारंभ चार मे 2024 रोजी झाला याप्रसंगी विद्यार्थ्यांचे स्वागत करताना शिक्षक कर्मचारी यांनी प्रसन्न वातावरणात औक्षण केले. यश अकॅडमी अंतर्गत बाल विद्यार्थ्यांसाठी खास उन्हाळी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे हा कॅम्प चार मे 2024 ते 11 मे 2024 पर्यंत उपक्रमाने सुरू राहणार आहे विविध उपक्रमामध्ये हॉर्स रायडिंग, जलतरण, योग साधना , क्रिकेट, माती कला, धनुर्विद्या व मनोरंजनासाठी खेळ यांचा समावेश करण्यात आला आहे.

राहण्याची वस्तीगृहामध्ये अत्यंत स्वच्छ व व सर्व सोयीने सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे
सकाळी नाष्टा व आहारामध्ये जीवनसत्व युक्त तसेच दुपारचे जेवण तदनंतर चहा व बिस्कीट रात्री जेवण आणि इनडोअर गेम्स खेळायला मिळणार आहेत .किशोर वयातील मुलांना संस्कार व खेळ तसेच करमणूक यांची उत्तम सांगड घातली आहे.यश अकॅडमी च्या मार्गदर्शिका व प्रमुख संचालिका सौ निवेदिता उदयन गडाख यांनी पालका बरोबर सुसंवाद साधला व विधायक सूचनांचा विचार करण्याच संदर्भात अश्वाषित केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!