ताज्या घडामोडी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प तसेच कृष्णा हॅास्पिटल कराड यांचे संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

जावळी तालुक्यातील दुर्गम वेळे, ढेण, तळदेव, मायणी, देऊर येथील स्थानिकांसाठी पार पडले “मोफत आरोग्य तपासणी शिबीर”
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प परिसरातील स्थानिकांना आरोग्यविषयी सुविधा मिळाव्यात व त्यांचे आरोग्य सुधारावे या उद्देशाने मा. श्री. मनिकंदा रामानुजम क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर, मा. श्री. उत्तम सावंत उपसंचालक ( कोयना ) सह्याद्री व्याघ्र राखीव यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण वनपरिक्षेत्रातील दुर्गम जावळी तालुक्यातील वेळे निरीक्षण कुटी (पुष्पवंती कुटी) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीरात वाड्या वस्त्यांवरील अबालवृद्धांनी सक्रिय सहभाग नोंदवला. या शिबीरामुळे स्थानिकांना कृष्णा हॅास्पिटल कराड येथिल तज्ञ डॅाक्टरांची सेवा लाभली. उच्च रक्तदाब, स्त्रीरोग, अस्थिरोग, नेत्ररोग, त्वचारोग, दंतविकार व कान-नाक-घसा इ. विषयी डॅाक्टरांनी तपासण्या करून ग्रामस्थांना मोफत औषधे दिली. या शिबीरात ग्रामस्थांचे मोफत ECG देखील काढण्यात आले. या शिबीराचा वेळे परिसरातील ६५ ग्रामस्थांनी लाभ घेतला. शिबीरात सहभागी झालेल्या रूग्णांच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत असे श्री. शिशुपाल पवार, वनक्षेत्रपाल पाटण यांनी सांगितले.
आरोग्य शिबिर यशस्वी होण्यासाठी श्री. मारुती करपे वनपाल वेळे, त्यांचे अधिनस्त वनरक्षक सर्वश्री. सोरट, कुंभार, पांडे, निकम, देसाई तसेच सर्व वनमजुर यांनी परिश्रम घेतले.
या शिबीराचे औचित्य साधून श्री. अवसरे रानभैरी ट्रेकर्स ग्रुप, सातारा, पोलीस मित्र, सातारा, माहिती अधिकार पत्रकार संरक्षण सेना, जिल्हा सातारा यांचे प्रतिनिधींकडून वेळे, ढेण, मायणी, तळदेव या वस्त्यांसाठी एकूण ०५ स्ट्रेचर भेटस्वरुपात देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!