ताज्या घडामोडी

बेलेवाडी, शिराळा येथे २१ एप्रिल रोजी दुसरे वारणेचा वाघ खुले कविसंमेलन

Spread the love

…. ज्येष्ठ साहित्यिक दि.बा.पाटील उदघाटक तर संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ. सूरज चौगुले

शिराळा प्रतिनिधी

बेलेवाडी ता. शिराळा येथे दि. २१ एप्रिल रोजी दुसरे ‘वारणेचा वाघ’ साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले असून त्याचे उदघाटन ज्येष्ठ साहित्यिक आणि द.म.सा.स.चे कार्याध्यक्ष दि.बा.पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या साहित्य संमेलनात खुले कविसंमेलन होणार असून प्रसिद्ध कवी आणि वक्ते तसेच साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक चळवळीत अग्रभागी असणारे, अ.भा. नाट्य परिषद, इस्लामपूरचे अध्यक्ष प्रा.डॉ.सूरज चौगुले हे कविसंमेलनाध्यक्ष पद भूषवणार आहेत. या संमेलनाला सन्माननीय अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक आनंदहरी, ज्येष्ठ साहित्यिक व तिळगंगा साहित्यरंग चे अध्यक्ष मेहबूब जमादार ,ज्येष्ठ कवी-गझलकार आणि शब्दगंधर्व साहित्य परिवाराचे संस्थापक अध्यक्ष विनायक कुलकर्णी, वरिष्ठ पत्रकार दिनेश हसबनिस उपस्थित राहणार आहेत. या खुल्या कविसंमेलनाचे सूत्रसंचालन कवयित्री कु.वृषाली पवार या करणार आहेत.शिराळा तालुक्यात साहित्याची, वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाढावी,त्या माध्यमातून समाजभान जागृत व्हावे या उद्देशाने बेलेवाडी येथील प्रसिद्ध युवा कवी विक्रम जाधव आणि जीवनगौरव मासिकाचे सहसंपादक , कवी महादेव हवालदार यांनी ‘वारणेचा वाघ’ साहित्य मंच,३२ शिराळा या मंचाची स्थापना ज्येष्ठ साहित्यिक व तिळगंगा साहित्यरंग परिवाराचे संस्थापक आनंदहरी यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली असून वारणेचा वाघ साहित्य मंच च्या माध्यमातून विविध साहित्यिक उपक्रम, साहित्य संमेलनाचे आयोजन ३२शिराळा तालुक्यात आयोजित करण्यात येणार आहे..
दि.२१ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता संपन्न होणाऱ्या या खुल्या कविसंमेलनाला रसिकांनी तसेच नामवंत व नवोदित कवींनी १५ मिनिटे आधी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक संयोजकांनी केले असून बेलेवाडी येथे आयोजित श्री ज्ञानेश्वरी पारायण मंडपामध्ये हे संमेलन संपन्न होणार असून वारणेचा वाघ साहित्य मंच सह ग्रामपंचायत, बेलेवाडी, श्री ज्ञानेश्वरी पारायण मंडळ, बेलेवाडी, सार्वजनिक गणेश मंडळ, बेलेवाडी, शिवाजी युवा प्रतिष्ठान, बेलेवाडी आणि अभिनव ग्रुप कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळ, रिळे हे या संमेलनाचे संयोजन करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!