ताज्या घडामोडी
शिराळा तालुका सैनिक संघटना व शिराळा नगरपंचायत यांचे कडून कारगिल विजय दिवस साजरा.

शिराळा प्रतिनिधी
03 मे 1999 ते 26 जुलै 1999 या कारगिल युद्धामध्ये ज्या 527 शूर जवानांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन भारत मातेच्या रक्षणासाठी शहीद झाले आणि याच दिवशी शत्रूवर आपला विजय प्राप्त करणाऱ्या शूर योद्यांना शिराळा तालुका सैनिक संघटना व शिराळ नगरपंचायत यांच्याकडून श्रद्धांजली चा कार्यक्रम आयोजित संपन्न झाला.
यावेळेस संघटनेचे ज्येष्ठ माजी सैनिक कॅप्टन रामचंद्र मानकर, पी आर पोतदार, सुभेदार बाजीराव देशमुख,अध्यक्ष ज्योतिर्लिंग पाटील,नगरपंचायत चे सीईओ सुरज कांबळे, अन्न कर्मचारी, माजी सैनिक, सैनिक परिवार व नागरिक उपस्थित होते.