ताज्या घडामोडी

विश्व मानवी तस्करीच्या विरोधात ” आधार बहुउदेशीय संस्था, महिला बालविकास,विधी सेवा प्राधिकरण जळगाव द्वारे जनजागरण कार्यक्रम

आरपीएफ अधिकारी यांचा विशेष सत्कार

30 जुलै जागतिक मानवी तस्करी विरोधी दिवसानिमित्त जळगाव रेल्वे स्थानकात जिल्हा महिला व बाल विकास विभाग, आधार बहुउद्देशीय संस्था, रेल्वे सुरक्षा बल (RPF) जळगाव आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ३० जुलै रोजी जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.
जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन या राष्ट्रीय. मानव तस्करी विरोधात समाजात जागरूकता निर्माण करणे हा उद्देश होता.बाल तस्करी विरोधातील लढा हा एकसंध, यंत्रणा मधील समन्वय आधारित असावा, या बाबत एकमताने सहमती दर्शवण्यात आली. आधार संस्था हे ‘जस्ट राइट्स फॉर चिल्ड्रेन’ या देशातील सर्वात मोठ्या बाल सुरक्षा नेटवर्क चे भागीदार आहेत. हे नेटवर्क सध्या ४१८ जिल्ह्यांमध्ये २५० हून अधिक स्वयंसेवी संस्थां बरोबर कार्यरत आहे व मागील काही वर्षांत बाल सुरक्षेसंबंधी कायदे घडवताना मोलाची भूमिका बजावत आहे.बाल तस्करी विरोधात पोलीस यंत्रणेला भेडसावणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करताना, या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी सध्याच्या कायद्यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याची, समाजाला जागरूक करण्याची आणि यंत्रणा मधील समन्वय बळकट करण्याची तातडीची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यामुळे वाचवलेल्या बालकांना वेळेत न्याय मिळवून देणे आणि पुनर्वसन प्रभावीपणे करता येणे शक्य होईल.

गेल्या वर्षभरात आधार संस्था यांनी बालमजुरी, तस्करी आणि बाल विवाह मुक्त अश्या 554 बालकांची सुटका केली आहे.आधार संस्थेने याकडे लक्ष वेधले आहे की, बाल तस्करी फक्त बालमजुरी किंवा लैंगिक शोषणा पुरती मर्यादित नाही. विशेषतः मुलींची तस्करी जबरदस्तीच्या विवाहासाठी देखील मोठ्या प्रमाणावर केली जाते, आणि ही बाब आजही फारशी नोंदवली जात नाही आणि दुर्लक्षित राहते.जुलै महिन्यात आधार ने रेल्वे सुरक्षा दला सोबत (RPF) भागीदारीत बाल तस्करी विरोधात जनजागृती मोहीम राबवली.तस्कर बहुधा रेल्वेचा वापर करून मुलांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नेतात, त्यामुळे या उपक्रमात प्रवासी, रेल्वे कर्मचारी, विक्रेते, दुकानदार आणि कुली यांना बाल तस्करीची लक्षणे ओळखणे आणि योग्य पद्धतीने रिपोर्ट करणे याबाबत संवेदनशील करण्यात आले.

बालकांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांचा समन्वय महत्त्वाचा असल्याचे अधोरेखित करताना, आधार संस्था अध्यक्ष डॉ भारती पाटील आणि संचालक रेणू प्रसाद म्हणाले, “बाल तस्करी रोखण्यासाठी गुन्हेगारांवर शिक्षा होणे अत्यावश्यक आहे. शिक्षा झाली तरच गुन्हेगारीला आळा बसेल आणि भीती निर्माण होईल. बचाव कार्या सोबतच जिल्हा प्रशासनाच्या समन्वयात, जलद आणि प्रभावी खटल्यांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. अशाच पद्धतीने आपण मुलांचे संरक्षण करू शकतो आणि तस्करी करणाऱ्या टोळ्यांचे नेटवर्क मोडू शकतो.”  बाल सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. बालकांची सुटका, त्यांचे पुनर्वसन आणि तस्करी विरोधात प्रभावी कारवाई यासाठी स्थानिक प्रशासन, पोलिस, सामाजिक संस्था, आणि कायदे मंडळ यांच्यात एकसंध प्रयत्न गरजेचे आहेत.यावर संवेदनशील असण्याची आवश्यकतेवर भर देण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाल निरीक्षण गृहाचे अधीक्षक रविकिरण अहिरराव होते. रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक अमित कुमार यादव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण च्या ॲड .शिल्पा रावेरकर, बाल संरक्षण समितीचे पवन पाटील, जीआरपी पोलीस निरीक्षक ए. आर. नगराळे, आधार बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा डॉ. भारती पाटील, संचालक रेणू प्रसाद, आणि स्टेशन अधीक्षक कौस्तुभ चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमादरम्यान, रेल्वे मार्गे होणाऱ्या बालकांच्या होणाऱ्या बालकांच्या मानव तस्करी बद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. मानव तस्करीचे प्रकार, त्यापासून मुलांना कसे वाचवता येईल आणि अशा घटनांची माहिती पोलिसांना कशी द्यावी, यावर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी मानव तस्करी हा एक गंभीर गुन्हा असून, तो रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

सत्कार
मानव तस्करी रोखण्यासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार ,गौरव करण्यात आला. यामध्ये नरेंद्र परदेशी (एस आय), शिवपूजन सिंग (एस आय), कॉन्स्टेबल पंकज वाघ, कॉन्स्टेबल सुनील कुमार, कॉन्स्टेबल चौधरी आणि कॉन्स्टेबल विनोद जेठवे यांचा प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये आणि स्थानकावरील कर्मचाऱ्यांमध्ये मानव तस्करी विरोधात महत्त्वाची जनजागृती झाली.
15 ते 30 जुलै दरम्यान अभियान राबविण्यात आले. जलगाव जिल्ह्यात भुसावळ, जळगाव , चाळीसगाव, अमळनेर रेल्वे स्थानकावर ध्वनीफित, बॅनर, पोस्टर, स्टिकर सह विविध स्वरूपात प्रवासी, स्टॉल दुकानदार, रेल्वे कर्मचारी व अधिकारी, प्रशासन यांच्यासह
यशस्वीपणे अभियान राबविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प समन्वयक आनंद पगारे यांनी केले . यशस्वितेसाठी तालुका समन्वयक मोहिनी धनगर, सुनील हिवाळे,दीपक
संदानशिव, अश्विनी भदाणे, संजय कापडे, मुरलीधर बिरारी, राकेश महाजन, वंदना पावरा, दीपक विश्वेश्वर, तोशिफ शेख, विकी शिरसाठ, विद्या सोनार,भाग्यश्री सोनवणे, समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथील विद्यार्थी, RPF&GRF कर्मचारी, रेल्वे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??