ताज्या घडामोडी

कळमसरे-प्र.डांगरी जि. प. गटासाठी तरुणाईला संधी द्या

इंजिनिअर गौतम पाटील यांना उमेदवारीची मागणी युवा कार्यकर्त्यात उत्साह

अमळनेर:- तालुक्यात आमदार अनिलदादा पाटील व माजी जि.प.सदस्या सौ जयश्रीताई पाटील यांचा बालेकिल्ला असलेला कळमसरे-प्र.डांगरी जिल्हा परिषद गट खुला झाल्याने या गटात गौतम अनिल पाटील यांना उमेदवारी देऊन तरुणाईला संधी देण्याची मागणी कळमसरे-प्र.डांगरी गटातील तरुणांनी केली आहे.आमदार अनिल पाटील व माजी जि.प. सदस्या जयश्री पाटील यांचे सुपुत्र गौतम पाटील यांना उमेदवारी देण्याचा मोठ्या प्रमाणात आग्रह होत आहे. गौतम पाटील हे स्वतः सिव्हिल इंजिनिअर असून अमेरिकेतून कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट शिक्षण घेतल्यानंतर पुन्हा मायदेशी परतून सद्यस्थितीत आपल्या परिवाराचा कन्स्ट्रक्शनचा बिझिनेस अतिशय उत्तमरित्या सांभाळत आहेत. हुशार, सुस्वभावी, सामाजिक विचारसरणी, काहीतरी नवीन घडविण्याची उमेद असे अनेक गुण गौतम पाटील अंगी असल्याने या तरुण व्यक्तीमत्वाने कळमसरे जि.प. गटातून राजकीय श्रीगणेशा करावा असा प्रचंड आग्रह गावागावातील तरुणाईकडून होऊ लागला आहे. याबाबत युवा पदाधिकारी व गटातील कार्यकर्ते यांच्याकडून आमदार अनिल पाटील यांना निवेदन देण्यात आले.उच्चशिक्षित व राजकीय वारसा असलेल्या गौतम पाटील यांना आमदारांनी त्यांच्या बालेकिल्ल्यात संधी द्यावी, ह्या संधीचे आम्ही युवा कार्यकर्ते सोने करून दाखवू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आमदार अनिल पाटील, जयश्री पाटील, गौतम पाटील यांच्या उपस्थितीत सादर निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी सोशल मिडिया जिल्हा उपाध्यक्ष करण साळुंखे, गौरव रावसाहेब पाटील, संग्राम पाटील, कल्पेश साळुंखे, योगेश पाटील, चेतन चौधरी, सचिन साळुंखे, ऋषिकेश पाटील, पीयूष वानखेडे, दर्शन सुर्वे, लोकेश झंवर, सनी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

 

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??