बेरडवाडी शाळेत आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी

मुरूम, ता. उमरगा, ता. ७ ( प्रतिनिधी) : बेरडवाडी, ता. उमरगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती रविवारी (ता. ७) रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कांतराव मंडले होते. यावेळी उपाध्यक्ष रंजीतकुमार भोकले, उपसरपंच दशरथ मंडले, पोलीस पाटील काशिनाथ वासुदेव, शिवाजी मंडले, चंद्राम भोसले, चंद्राम मंडले, भालचंद्र मंडले, रंगुबाई वासुदेव, सपना मंडले आदींची प्रमुख उपस्थिती होती. मुख्याध्यापक अनिल मुडमे, सहशिक्षक सुनिल राठोड, युवराज चव्हाण, बालाजी भालेराव, सहशिक्षिका रंजना तांदळे, युवा प्रशिक्षणार्थी राधिका मंडले आदींनी पुढाकार घेतला. याप्रसंगी सुनिल राठोड यांनी आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या शौर्यपूर्ण कार्याचा आढावा घेताना म्हणाले की, इंग्रजांविरुद्ध दिलेल्या लढ्याची, त्यागाची आणि बलिदानाची आठवण करून देत विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा, असे आव्हान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज चव्हाण तर आभार अनिल मुडमे यांनी मानले. गावातील बहुसंख्येने नागरिक, पालक उपस्थित होते. फोटो ओळ : बेरडवाडी, ता. उमरगा येथील जिल्हा परिषद शाळेत उमाजी नाईक यांची जयंती साजरी करताना मान्यवरसह शिक्षक वृंद व विद्यार्थी-विद्यार्थिनी.