शिक्षक दिन शेफर्ड शाळा व मँगो गार्डन ज्येष्ठ नागरिक संघटना मिळून साजरा.

शिराळा प्रतिनिधी
दिनांक5/09/2025 रोजी गुड शेफर्ड शाळेचा शिक्षक दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात हॉटेल ग्रँड 51, सेक्टर 15 बेलापूर येथे साजरा करण्यात आला. या ठिकाणी प्रमुख पाहुणे श्री सुरेश पोटे (महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेस्कॉम मुंबई अध्यक्ष ) त्याचबरोबर द असोसिएशन फॉर सीनियर सिटीजन मँगो गार्डन बेलापूर येथील काही सदस्य सदिच्छा देण्यासाठी उपस्थित होते. गुड शेफर्ड शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. लता प्रकाश पोवार आणि प्रमुख पाहुणे श्री सुरेश पोटे या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले या कर्यक्रमात बोलताना फेस्कॉम अध्यक्ष सुरेश पोटे यांनी लहापणीच्या आठवणी व ज्येष्ठाचे वाढणारे आयुर्माना बरोबर जगामध्ये अनेक बदल होत आहेत या साठी शिक्षकांनी सतत अपडेट राहण आवश्यक आहे असे सांगितले.या कार्यक्रमात नृत्य संगीत नाट्य, गायन, संगीत खुर्ची, तसेच विविध प्रकारच्या खेळांचा समावेश करण्यात आला होता. शिक्षकवृंद तसेच ज्येष्ठ नागरिक सदस्यांनी देखील मनमुराद आनंद लुटला अशाप्रकारे सामूहिक गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.