डॉ. रंगनाथन यांची जयंती माधवराव पाटील महाविद्यालयात साजरी….

. मुरूम, ता. उमरगा, ता. १२ (प्रतिनिधी) : येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात ग्रंथालयाच्या वतीने ग्रंथालयशास्त्राचे प्रणेते पदमश्री डॉ. रंगनाथन यांची ११३ वी जयंती मंगळवारी (ता. १२) रोजी साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्या हस्ते डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रतापसिंग राजपूत, प्रा. अशोक बावगे, ग्रंथपाल डॉ. राजकुमार देवशेट्टे, डॉ. राम बजगिरे, डॉ. रवी आळंगे, डॉ. सायबण्णा घोडके, प्रा. गोपाळ कुलकर्णी, डॉ. अविनाश मुळे, डॉ. प्रकाश कुलकर्णी, प्रा. दिनकर बिराजदार, डॉ. सुधीर पंचगल्ले, विजयालक्ष्मी भालेराव, नितीन कंटेकुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयात डॉ. रंगनाथन यांची जयंती साजरी करताना अशोक सपाटे, चंद्रकांत बिराजदार व अन्य.