ताज्या घडामोडी

ईश्वरपूर : प्रतिनिधी

उरूण ईश्वरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दशसूत्री जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. आमची सत्ता आल्यानंतर आम्ही शहरातील नागरिकांना कोणत्या मुख्य १० सोई-सुविधा उपलब्ध करून देणार आहोत,हे सांगणारा आमचा जाहीरनामा आहे. आमच्या सहकाऱ्यांना संधी द्या,मी व माझे सहकारी हा जाहीरनामा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करू,अशी ग्वाही आ.जयंतराव पाटील यांनी याप्रसंगी दिली.

प्रा.शामराव पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील,जेष्ठ नेते बी.ए. पाटील (बापू),माजी नगराध्यक्ष पै.भगवान पाटील,माजी नगरसेवक खंडेराव जाधव, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील,माजी महिला शहराध्यक्षा रोझा किणीकर,प्रदेश सदस्या कमल पाटील,प्राचार्य राजेंद्र कुरळपकर,शेतकरी संघटनेचे गणेश शेवाळे प्रामुख्याने उपस्थित होते.आ.पाटील म्हणाले,या शहरातील उध्वस्त केलेल्या मूलभूत सोई-सुविधा पुन्हा दुरुस्त करणे,हे मोठे आव्हान आहे. पिण्याच्या पाण्याची,तसेच रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. शहरातील वाहतूक कोंडी हा गंभीर विषय आहे. आम्ही शहरातील मूलभूत सोई- सुविधा दुरुस्त करून प्रशासन पारदर्शी आणि लोकाभिमुख करणार आहोत. शहरातील बेघरांच्या घरकुल योजना मार्गी लावणे, शिक्षणाचा दर्जा वाढविणे,तसेच हे शहर पुन्हा राज्यातील एक प्रगत व स्वच्छ- सुंदर शहर बनवू. आमच्या सुशिक्षित,अनुभवी,तरुण सहकाऱ्यांना आशिर्वाद द्यावा. आमच्यामध्ये गट-तट नाहीत,आमचे कार्यकर्ते एकजिनसी पणाने काम करीत आहेत. मूलभूत व नागरी सुविधा,हरित व स्वच्छ शहर,महिला व युवा सक्षमीकरण,आरोग्यदायी समाज,गुणवत्ता पूर्ण शिक्षण,कृषी विकास,सर्व समावेशक विकास,पारदर्शी प्रशासन,स्थानिक उद्योग व रोजगार आणि सांस्कृतिक वारसा,संरक्षण व विकास अशी ही शाश्वत विकासाची दशसूत्री आहे. प्रा.शामराव पाटील म्हणाले,आम्ही शहरात राहणाऱ्या नागरिकांच्या सूचना घेऊन वास्तव वादी जाहीरनामा देत आहोत. आम्हास शहरा तील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या निवडणुकीत १९८५ ची पुनरावृत्ती होऊन आमचे नगराध्यक्ष व सर्व उमेदवार विक्रमी मतांनी विजयी होणार आहेत.शहाजी पाटील म्हणाले,आम्ही गेल्या पाच वर्षात काय केले,आणि पुढील पाच वर्षात काय करणार हे सांगत लोकांच्या दारात जात होतो. मात्र विरोधकांनी २०१६ पासून ही ३५ वर्षाची परंपरा खंडीत केली आहे. सत्ता नसताना आ.जयंतराव पाटील यांनी शहराच्या विकासाला कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे.माजी उपनगराध्यक्ष शंकरराव चव्हाण, संचालक शैलेश पाटील,उमेश रायगांधी,युवक शहराध्यक्ष दिग्विजय पाटील,राजू खरात, संजय खवळे,रविंद्र वाघमोडे,चंद्रकांत ताटे, सुनिल माळी,मनोज करे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??