ताज्या घडामोडी

मुंबई माळी समाज मंडळाच्या वतीने क्रांती सूर्य महात्मा जोतिबा फुले यांना आदरांजली.

Spread the love

महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त श्री क्षत्रिय माळी समाज समाज सुधारणा मंडळ,मुंबई यांच्या वतीने क्रांती सूर्य महात्मा जोतिबा फुले यांना आदरांजली वाहण्यासाठी माळी समाज भवन, उल्हासनगर-४ येथे छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.मंडळाचे विश्वस्त मा.निळकंठ महाजन व मा.दंगल माळी यांनी महात्मा फुले व संत शिरोमणी सावता महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला तर मंडळाच्या कार्यकारी सदस्या सौ.रजनी माळी यांनी क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रा.प्रकाश माळी,उपाध्यक्ष प्रकाश महाजन,सचिव हरिलाल खुनेपिंपरे,सहसचिव प्रा. सुनिल महाजन,खजिनदार प्रा.भागवत शेलकर,कार्यकारी सदस्य कार्यकारी सदस्य दिलीप माळी,गुलाब महाजन,लक्ष्मण माळी,विष्णू महाजन,युवराज मगरे,प्रा.सुभाष जाधव,रमेश महाजन,राजेंद्र गीते,साहेबराव महाजन,संतोष माळी,सतिश महाजन,वासुदेव राजकुळे,संभाजी माळी,जगन्नाथ माळी व गजानन महाजन यांनी महात्मा फुले यांना पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!