ताज्या घडामोडी

*NEET पेपरफुटी प्रकरणाचा अमळनेर PTA व शैक्षणिक संस्थेतर्फे तीव्र निषेध व्यक्त करत प्रांताधिकारी यांना दिले निवेदन

अमळनेर : विद्यार्थ्यांच्या भविष्याशी घात करणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अमळनेर PTA तसेच शैक्षणिक संस्था प्रमुख यांच्या वतीने सोमवार, दि. 18 मे रोजी प्रांतकार्यालयपरिसरातशांततामय पद्धतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात आले. यावेळी अमळनेरचेप्रांताधिकारी मा. श्री. मयूर भंगाळे साहेब यांना निवेदन सादर करण्यात
आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमळनेर PTA चे अध्यक्ष श्री.भैय्यासाहेब मगर सर यांनी केले. शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व मा. श्री.संदिप घोरपडे सर यांनी प्रमुख मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या
मेहनतीशी व भविष्याशीहोणारी
तडजोड असह्यअसल्याचेसांगत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.PTA तर्फे सौ. सुरश्री वैद्य मॅडम तसेच श्री. सुधीर टाकणे सर यांनी मनोगत व्यक्त केले. NEET अन्यायग्रस्त विद्यार्थी लावण्या सातपुते व अजिंक्य पाटील यांनी आपल्या भावनाव्यक्तकरतविद्यार्थ्यांवरील मानसिक ताण आणि अन्याय अधोरेखित केला.यावेळी“विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड नाही”, “पेपरफुटी करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे” अशा घोषणा देत शांततामय पद्धतीने निषेध व्यक्त करण्यातआला.सदरआंदोलनात श्री. किरण माळी सर, श्री. राकेश बडगुजर सर, सौ. सुरश्री वैद्य मॅडम, श्री. ज्ञानेश्वर मराठे सर, श्री. नागराज माळी सर, श्री. हर्षल बडगुजर सर, श्री. स्वर्णदीप राजपूत सर, श्री. संदीप महाजन सर, श्री. सुधीर टाकणे सर ,श्री. ज्ञानेश्वर साळुंखे सर , श्री.अविनाश कोळी सर, श्री. सुनील पाटील सर आदी PTA क्लास संचालक उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??