ताज्या घडामोडी

विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन व गळीत हंगाम शुभारंभ

आमदार बसवराज पाटील यांच्या हस्ते सोहळा संपन्न; कार्यक्षेत्रातील एकही ऊस गाळपाविना राहणार नाही : चेअरमन बसवराज पाटील

​मुरूम, ता. उमरगा, ता. २० (प्रतिनिधी) :
येथील श्री. विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचा २०२६-२७ या वर्षाचा बॉयलर अग्निप्रदीपन व गळीत हंगाम शुभारंभ सोहळा मंगळवारी (ता. २०) रोजी कारखाना कार्यस्थळावर उत्साहात संपन्न झाला. कारखान्याचे चेअरमन आ. बसवराज पाटील यांच्या शुभहस्ते हा सोहळा पार पडला.

कारखान्याचे कामकाज चेअरमन आ. बसवराज पाटील यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली सुरू असून चालू गळीत हंगामासाठी आवश्यक असणारी सर्व तयारी व कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या वर्षी कारखाना कार्यक्षेत्रात लागण व खोडवा मिळून जवळपास १८,००० हेक्टर उसाची नोंद झाली आहे. या मुबलक उपलब्धतेचा विचार करून कारखाना व्यवस्थापनाने जास्तीत जास्त ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यासाठी पुरेशी ऊसतोडणी व वाहतूक यंत्रणा सज्ज करण्यात आली असून तिचे योग्य नियोजनही करण्यात आले आहे.
​याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना चेअरमन आ. बसवराज पाटील म्हणाले की, चालू हंगामात कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून गाळपास येणाऱ्या उसाला योग्य व रास्त भाव दिला जाईल. तसेच कार्यक्षेत्रातील एकाही शेतकऱ्याचा ऊस गाळपाविना शिल्लक राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
​या सोहळ्याला कारखान्याचे व्हाईस चेअरमन सादीकसाहेब काझी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापुराव पाटील, उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरण पाटील, कारखान्याचे संचालक ॲड. सुभाष राजोळे, केशवराव पवार, शरणप्पा पत्रिके, दिलीप पाटील, विठ्ठल बदोले, राजीव हेबळे, संगमेश्वर घाळे, माणिक राठोड, रामकृष्णपंत खरोसेकर, डॉ. दिलीप गरुड, शब्बीर जमादार, ॲड. संजय बिराजदार, दत्तु भालेराव, शिवलिंगप्पा माळी, शिवमुर्ती भांडेकर, ॲड. विरसंगप्पा आळंगे, संतराम बिराजदार, प्रकाश आष्टे, बलभिम पाटील, नानासाहेब पाटील, ॲड. बाळासाहेब पाटील, ह.भ.प. शरद बिराजदार महाराज, ह.भ.प. अडागळे महाराज बोरीकर, रशिद शेख, राजु वाघमारे, रफिक तांबोळी, प्रल्हाद काळे, रविंद्र चव्हाण, मल्लिनाथ दंडगे, ॲड. विश्वनाथ बिराजदार, गोविंद पाटील, देवेंद्र कंटेकुरे, पप्पु सगर, ॲड. स्वप्नील कारभारी, नागनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
​तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. आर. गवसाणे, फॅक्टरी मॅनेजर राजेंद्र काळे यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी, कामगार, सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??