कृषी व व्यापार

पावसा संदर्भातील एकमेव आशादायक किरण

अंदमान आणि परिसरात तीन ते चार मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ तयार होत आहेत. ही वादळे भारताच्या पूर्व भागातील किनारपट्टीवर येऊन आदळतील. जर त्यापैकी एखादे मोठे वादळ विशाखापट्टण व खालील भारताच्या पूर्व भागावर आदळे तर त्यातील जोराचा पाऊस पडत पडत महाराष्ट्राकडे 11 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर पर्यंत येऊ शकतो जर हे वादळे ओरिसाकडे सरकले तर महाराष्ट्राकडे पाऊस येण्याची शक्यता कमी वाटते व त्यामुळे दुर्दैवाने रब्बी हंगाम संकटात येऊ शकतो. तीन ते चार चक्रीवादळापैकी मोठे वादळ विशाखापट्टण येऊन आदळले तर महाराष्ट्राला त्याचा फायदा होईल. शेतकरी बंधूंनी पिकांची रचना करताना गहू घेऊ नये तसेच अत्यंत कमी पाणी लागणारे पीक किंवा एक दोन संरक्षित पाणी देणारे व्यवस्था असल्यास हरभरा घ्यावा. या चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फायदा झाल्यास त्यापासून चाऱ्याची पिके व जनावरांच्या पिण्याच्यापाण्याचा प्रश्न काही अंशी सुटण्यास निश्चित मदत होऊ शकते. रब्बी हंगामात रब्बी हंगामात आता मात्र परतीच्या पावसाची शक्यता मावळलेली आहे. तरी अंदमान निकोबार परिसरातील मोठे चक्रीय वादळ महाराष्ट्राला एकमेव आशादायक किरण शिल्लक राहिलेला आहे असे मत कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी प्रतिपादित केले आहे

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??