ताज्या घडामोडी

कोकण विभाग गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२६  (दक्षिण रायगड विभाग) उत्साहात साजरा

आमदार श्री ज्ञानेश्वरजी म्हात्रे* यांच्या अध्यक्षतेखाली) पार पाडलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२६ या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री रायगड जिल्हा नामदार श्री.भरतशेठ गोगावले व खासदार धैर्यशील दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

*कोकण विभाग गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२६* ”
(दक्षिण रायगड विभाग)

​ज्ञान, निष्ठा आणि समर्पित सेवेच्या जोरावर शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या दक्षिण रायगड विभागातील आदरणीय संस्था, मुख्याध्यापक ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा गौरव करण्यासाठी या भव्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.शिक्षक हे केवळ ज्ञान देत नाहीत, तर समृद्ध समाज आणि राष्ट्राची उभारणी करतात.” आपल्या उत्कृष्ट अध्यापन पद्धती, सामाजिक बांधिलकी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अहर्निश परिश्रम घेणाऱ्या दक्षिण रायगड क्षेत्रातील 85 गुणवंत संस्था, मुख्याध्यपाक, शिक्षक शिक्षकेतर बंधू भागूनींचा ” *कोकण विभाग गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२६* ” देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी ​पालकमंत्री ना. भरतशेठ गोगावले – मंत्री, रोजगार हमी व फलोत्पादन,​खासदार – श्री. धैर्यशील पाटील – जिल्हाध्यक्ष द. रायगड,​श्री. विजयराज खुळे – अध्यक्ष, माणगाव ता. एज्यु. सोसा,,​श्रीम. गीता ताई पालेचा – सुधागड एज्यु. सोसा. ट्रस्टी,​ संपर्क प्रमुख राजेंद्र पवार, श्री. विजय देरकर – शिक्षक परिषद , ,​श्री. रवींद्र पालवे – मुख्याध्यापक, सुधागड एज्यु.
​श्री. विनायक गुळवणी – सल्लागार , महेंद्र शिर्के, ,​श्री. बाबुराव कांबळे – सल्लागार, कार्यवाह ​श्री. गुलाबराव येरुणकर – सल्लागार ,​श्री. रवींद्र गिरासे – सहसचिव,​श्री. संजय गायकवाड – सल्लागार,​श्री. दत्तात्रय उतेकर, अध्यक्ष​श्री. राजकुमार मुंढे,उपाध्यक्ष
​श्री. शहाजी बेरे ,सचिव ​श्री. आदेश सुतार, महिला आघाडी प्रमुख जिल्हा ​सौ. किरण काप – महिला आघाडी प्रमुख जिल्हा ,​श्री. हनिफ शेख सर ,​श्री. अली सर म्हसळा , श्री तुषार बगडे जिल्हा सदस्य, कृष्णा पानवकर, गांगण सर, श्री सुनील शिंदे अध्यक्ष पोलादपूर, श्री राजू जाधव सचिव पोलादपूर, श्री विक्रम काटकर,अध्यक्ष सुधागड, श्री विकास निकम सचिव सुधागड, श्री. कमरुद्दिन बांगी अध्यक्ष म्हसळा, श्री अंगद कांबळे सचिव म्हसळा ,श्री नंदकुमार देवळेकर अध्यक्ष रोहा ,श्री राजेश पाखरे सचिव रोहा, श्री पोपट कसबे अध्यक्ष तळा, श्री मनोहर वालगुडे सचिव तळा, श्री हिरामण म्हात्रे श्री गणेश पवार ,सचिव महाड,श्री.प्रमोद घोसाळकर शिवसेना जिल्हाप्रमुख, श्री दिनेश हरवंडकर जिल्हा परिषद सदस्य, श्री. रवींद्र टेंबे पंचायत समिती सदस्य, श्री युवराज मुंडे तालुका अध्यक्ष माणगाव, श्री निलेश राशिनकर. , श्री रोशन चाफेकर नगरसेवक रोहा , श्री.अमित घाग तालुका अध्यक्ष रोहा. महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना दक्षिण रायगड जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी, तसेच जवळपास 800 संस्था चालक, मुख्याद्यापक, शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनी उपस्थित होते.

 

 

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??