चोरीच्या गुन्ह्यातील दोन लाख रूपयांचा ऐवज मूळ मालकाला परत करण्यात आष्टा पोलीसांना यश

ईश्वरपुर
आष्टा पोलीस ठाणे मध्ये खालील दाखल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन, आरोपीकडून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करून, यातील फिर्यादी यांना माननीय न्यायालयाच्या आदेशाने एकूण दोन लाख रुपये किमतीचे तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख वीस हजार रुपये योग्य त्या अटी शर्तीवर परत केलेला आहे. (1) भाग -5 गुन्हा रजिस्टर नंबर 178 /2026 बी एन एस कलम 303 (2) मधील जप्त करण्यात आलेला मुद्देमाल 20,000/- रोख रक्कम ,30,000/-एक 10 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस ,30,000/-एक 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण असे एकूण दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने व रोख वीस हजार रुपये हे मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो इस्लामपूर यांचे आदेशाने मूळ मालक अर्जदार- सविता भरत खरात वय 41 वर्षे धंदा गृहिणी रा. कमळापूर ता.खानापूर जि.सांगली यांना योग्य त्या अटी व शर्तीवर परत ताब्यात देण्यात आलेला आहे. तसेच गुन्हा रजिस्टर नंबर 180 /2026 बी एन एस एस कलम 303 (2) मधील जप्त करण्यात आलेला मुद्देमाल , 1,40,000/-एक 10 ग्रॅम वजनाचे काळे मणी व सोन्याचे मनी त्यास पदक असलेले सोन्याचे गंठण संपूर्ण गंठण चे अंदाजे 26 ग्रॅम वजनाचे किं.अं.हे मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो इस्लामपूर यांचे आदेशाने मूळ मालक अर्जदार- रोहिणी हौसेराव बल्लाळ वय 43 वर्षे धंदा गृहिणी रा. १०० फुटी रोड मिरज ता. मिरज जि.सांगली यांना योग्य त्या अटी व शर्तीवर परत ताब्यात देण्यात आलेला आहे .



