ताज्या घडामोडी

प्रतिपंढरपूर अमळनेरला आषाढी एकादशीच्या श्री संत सखाराम महाराजांच्या यात्रेत भाविकांसाठी जी एस हायस्कूल मित्र परिवारातर्फे पाणी बॉटलचे वाटप

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील प्रतिपंढरपूर अमळनेरला आषाढी एकादशीच्या श्री संत सखाराम महाराजांच्या यात्रेत भाविकांसाठी जी एस हायस्कूल मित्र परिवारातर्फे पाणी बॉटलचे वाटप
श्री संत सखाराम महाराज यांचि आज एकादशी निमित्त प्रति पंढरपूर अंमळनेर येथे भरलेल्या महायात्रेत जी एस हायस्कूल मित्र परिवाराकडून पाण्याचा बॉटल आग्रहाने प्रत्येक भाविकांना बोलून वाटप करण्यात आले पूज्य साने गुरुजी जेष्ठ नागरिक मंडळ अमळनेर यांनीही दिला मदतीचा हात त्या वाटपाच्या ठिकाणी जी एस हायस्कूल मित्र परिवाराचे खालील सदस्य हजर होते दत्ता कासार, कीर्ती कोठारी, मुकेश पारख, संजय वंजारी शरद पाटील, मुकेश शारदुल, कृष्णा पाटील, वेदांत कोल्हे पूज्य साने गुरुजी जेष्ठ नागरिक मंडळाचे सचिव एस एम पाटील, उपाध्यक्ष उमाकांत नाईक,सौ हेमलता उमाकांत नाईक, शालिग्राम पाटील यांनी खेडेगावाहून येणाऱ्या तहानलेल्या भाविकांसाठी अक्वागार्डच्या शुद्ध पाण्याच्या अर्धा लिटर मापाच्या बाटल्यांचे वाटप केले अतिशय उकाळा होत असल्याने पाणी पिऊन भाविक तृप्त झालेत व जी एस हायस्कूल मित्र परिवारास खूप खूप धन्यवाद दिलेत श्री समर्थ सद्गुरु सखाराम महाराज की जय या नावाने वाडी चौक भाग दुमदुमत असून यात्रेसाठी 200 मीटर पर्यंतच्या रांगा लागलेल्या आहेत यात्रेत नारळ प्रसाद खेळणी व इतर एकादशीच्या फराळाचे सर्व साहित्य विक्रीसाठी आलेल्या असून अनेक भाविक वेगवेगळी सेवा देत आहेत

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??