ताज्या घडामोडी

अखिल पार्क साईट सेवा संघाचे विक्रोळीत रविवारी रक्तदान शिबीर

मुंबई- मुंबई महापालिका रुग्णालय आणि सर्वच रक्तपेढ्यांमध्ये नोव्हेंबर महिन्यात रक्तटंचाई भासत असते.या पार्श्‍वभूमीवर अखिल पार्क साईट सेवा संघाच्यावतीने रविवार १६ नोव्हेंबर रोजी विक्रोळी (प) येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान वेल्फेअर सेंटर,पार्क साईट येथे महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे,अशी माहिती सेवा संघाचे प्रमुख सुनील काजरोळकर यांनी दिली.

अखिल पार्क साईट सेवा संघाचे रक्तदान शिबिराचे यंदाचे २८ वे वर्ष आहे.रविवार १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे रक्तदान शिबीर होणार आहे. राजावाडी रुग्णालय,सर जे जे महानगर रक्तकेंद्र आणि केईएम रुग्णालय या शिबिराच्या रक्त संकलक रक्तपेढ्या आहेत.तरी १८ ते ६५ वयोगटातील ४८ किलो वजन असलेल्या महिला आणि ४५ किलो वजन किंवा त्यापेक्षा जास्त वजन असलेल्या इच्छुक पुरुष रक्तदात्यांनी या या रक्तदान शिबिरामध्ये आपले योगदान द्यावे,
आवाहन अखिल पार्क साईट सेवा संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??