अंत्री बुद्रुक स्वामी धाम मठात ” दिवाळी पहाट ” उत्साहात साजरी

शिराळा प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान आयोजित स्वामी धाम अंत्री बुद्रुक मठात पहाटे चार ते साडेसहा वाजेपर्यंत जय हनुमान समाज प्रबोधन भजनी मंडळ, पाडळी आणि जय हनुमान भजन मंडळ, उपवळे याने संगीत भजन ,गवळणीचा बहारदार कार्यक्रम सादर केला.
दिवाळी पहाट प्रित्यर्थ प्रतिष्ठानच्या वतीने स्वामी धाम मठात अभंग, गौळणी चार उत्कृष्ट कार्यक्रम पार पडला.तसेच दिवाळी पाडव्याच्या शुभ दिवशी ” एक दिवा सैनिकांसाठी ” तेवत ठेवून सैनिकाप्रती व देशासाठी कृतज्ञता तेवत ठेवली.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर गायक वादकादिंचा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी रसाळ गुरुजींच्या हस्ते भजनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा शाल श्रीफळ व दिवाळी भेट देऊन सन्मान करण्यात आला.दिवाळी पहाट उत्कृष्ट साजरी करण्यासाठी श्रीरंग चव्हाण अधिकराव पाटील पाडळी, तसेच विकास पाटील, उपवळे, सर्जेराव पाटील ,किसन कदम, महादेव पाटील, प्रकाश पाटील ,सुरेश कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.



