ताज्या घडामोडी

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलचा संघ प्रथम.

मुरूम, ता. उमरगा, ता. ९ (प्रतिनिधी) : उमरगा तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत चौदा वर्ष वयोगटात प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलच्या क्रिकेट संघाने तालुक्यातून प्रथम विजेतेपद पटकाविल्याबद्दल माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापुराव पाटील, उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील, नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी आदींनी त्यांचे कौतुक केले. या संघाने अंतिम लढतीत फलंदाजी व गोलंदाजीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजेतेपद मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी या खेळाडूंची निवड झाली. यावेळी उमरगा तालुका क्रीडा सचिव राजेंद्र सोलंकर, सुजित शेळके, नारायण सोलंकर, जयसिंग राठोड उपस्थित होते. या विजेत्या संघामध्ये कर्णधार मयुरेश कांबळे, आदर्श मेणसे, तहलिल लोणी, विराट राजपूत, नालसाब बागवान, आणप्पा बन्ने, गौरव सरसंबे, गणेश बिराजदार, रोशनअली सुलेपेठ, आर्यन गुरव, रितेश गायकवाड, कुणाल सागर आदींचा सहभाग होता. या खेळाडूंना शिक्षक सागर मंडले यांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी खेळाडूंचा सत्कार मंगळवार (ता. ९ ) रोजी सच्छिदानंद अंबर, डॉ. पुरुषोत्तम बारवकर, मुख्याध्यापिका अनुराधा जोशी, धनराज हळळे, संगमेश्वर लामजने यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विरेंद्र लोखंडे, सुभाष धुमाळ, पंकज पाताळे, नेहा माने, शितल घोडके, अश्विनी क्षीरसागर, सोनाली कारभारी, तनुजा जमादार, प्रभावती कलशेट्टी, साधना शेवाळकर, गीता सत्रे, सरस्वती जाधव, सरोजा सारणे, सुधाराणी पाटील, श्रीदेवी मंडले, पुजा मरबे, इंदिरा व्हट्टे, साक्षी देशमाने, जास्मिन मुल्ला आदींनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार जगदीश सुरवसे यांनी मानले. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूल च्या वतीने तालुका क्रिकेट स्पर्धेत विजेत्या खेळाडूंचा सत्कार करताना मान्यवर व शिक्षकवृंद.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??