ताज्या घडामोडी

नव दुर्गा विशेष – माँ चंद्रघंटां सौ. गायत्री मंडलिक मोहाडीकर

संचालिका – गायत्री वास्तू कन्सल्टन्सी

व्यक्ती समाजात जितक्या उंचीवर पोहचते ते फक्त त्या व्यक्तीत असलेल्या कर्तुत्वामुळेच नव्हे…तर तिच्यासोबत असलेल्या लोकांचा सुद्धा त्यात महत्वाचा वाटा असतो…आपण मोठे म्हणण्यापेक्षा आपल्याला मोठे करणारी आपली लोकं मोठी असतात. सांगत आहेत. आजच्या आपल्या नव दुर्गा सौ. गायत्री मंडलिक मोहाडीकर, यांच्याशी नव दुर्गा विशेष २०२५ या सदर साठी खास बातचीत केली आहे रिता इंडिया फाउंडेशन च्या संस्थापिका डॉ. रिता शेटीया यांनी….

तुमच्या विषयी थोडक्यात सांगाल.

माझे नाव गायत्री मंडलिक मोहाडीकर. मी वास्तुशास्त्र कन्सल्टंट,नुमरोलॉजिस्ट (अंकशास्त्र तज्ञ), रेकी ग्रँडमास्टर, जोतिषशास्त्र tadnya, टैरो कार्ड रीडर, लोलकशास्त्र तज्ञ, रत्नशास्त्र तज्ञ, एंजेल थेरेपिस्ट, टॅरो कार्ड रीडर म्हणून संबंधित व्यवसायात, गेली १३ वर्ष झाले कार्यरत आहे. मी वास्तुशास्त्र या विषयात पदवीधर परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. आपल्या ज्ञानाचा वापर करून, समाजातील सर्व स्तरातील लोकाना त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी मदत करण्याचा ध्यास मी मनाशी धरला आणि त्या ध्यासातूनच मी २०१३ साली गायत्री वास्तू, कन्सल्टन्सी वास्तू कन्सल्टन्सी अँड क्रिस्टल स्टुडिओ ची स्थापना केली. सामाजिक जाणिवेतून दरवर्षी जनजागृतीसाठी मोफत बास्तुशास्त्र सेमिनार घतले जातात. वर्षातून काही काळात गरजूंना, विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन केले जाते. ३. या क्षेत्रात सहसा महिला मोठ्या प्रमाणावर दिसत नाही, तुम्ही हा व्यवसाय सुरू करताना तुम्हाला आलेल्या समस्या याविषयी थोडक्यात सांगाल. माझे वय वर्ष १९ असताना मी व्यवसायास सुरुवात केली, भरपूर ज्ञान असूनही इतक्या कमी वयाची मुलगी आपल्या अडचणीचे निवारण कशी करणार? असे आलेल्या सर्व क्लायंट्स ला वाटायचे. त्यामुळे स्वतःला सिद्ध करुन सर्वांचा विश्वास संपादन करणे आवश्यक होते आणि माझ्या ज्ञानाच्या साहाय्याने दाखविले. एक मुलगी म्हणून वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र या व्यवसायात कार्यरत असताना स्वतः ला सिद्ध केले. सर्व क्लायंटसला त्यांच्या समस्यांवर मार्गदर्शन करून १००% रिझल्ट दिला आणि सर्वांचा विश्वास संपादन झाला. गायत्री वास्तु मध्ये माझ्या मार्गदर्शना द्वारे आज हजारो क्लायंट्स सुखमय आणि समाधानकारक जीवन व्यतित करत आहेत.

वास्तू शास्त्रानुसार घटस्थापना करताना कोणत्या गोष्टी महत्वपूर्ण आहे.

वास्तुशास्त्रानुसार घटस्थापनेसाठी वास्तूचा उत्तर ईशान्य भाग सर्वोत्तम मानला जातो. तसेच आग्नेय कोपऱ्यात (दक्षिण पूर्व अखंड दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. या वर्षी घटस्थापने साठी शुभ मुहूर्त २२सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ६. ०९ मिनिटापासून, ८. ०६ मिनिटापर्यंत असणार आहे. अभिजित मुहूर्त हा सकाळी ११. ४९ वाजल्या पासून
दुपारी १२. ३८ मिनिटा पर्यंत असेल. तर या मुहूर्ताना घटस्थापना करणे शुभ राहील.

नव दुर्गा म्हणजे ९ रूप तर अंक शास्त्रानुसार या ९ अंकाचे महत्व सांगाल.

अंकशास्त्रनुसार ९ हा मंगळ ग्रहाचा शासक आहे, अंक
९ हा शक्तिशाली अंक मानला जातो. ९ हा क्रमांक इतका शक्तिशाली, धैर्यवान आणि भाग्यवान क्रमांक आहे कारण त्यावर मंगळाचे राज्य आहे. साहस, उद्देश, कर्तव्य, आदेश, अनुशासन, बहादुरी, धैर्य, मेहनत आणि आत्मविश्वास या ९ गुणांच्या स्वरूपात मंगळ ग्रह आणि आपल्या नवदुर्गा आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रभावशाली आशीर्वाद देतात.

वास्तु शास्त्र चे महत्व सांगणारा एखादा अनुभव सांगाल.

काही वर्षाआधी एक क्लाइंट त्यांची समस्या घेऊन सांगाल.
माझ्याकडे आले. आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत, बायकोची नोकरी गेली आहे, आईला कॅन्सर झाला असून मुलाचे परीक्षेत विषय राहिले आहे आणि भावाच्या लग्नाला ६ वर्ष होऊनही संतती नाही. या समस्याना बघता मी त्यांची वास्तु व्हिजीट केली आणि त्यावर त्यांना विस्तृतपणे वास्तुशास्त्र आणि प्रत्येकाच्या कुंडली अनुसार मार्गदर्शन केले. साधारण ९०% उपाय आणि रेमिडिज त्यानी केल्या नंतर वर्षभरात त्यांच्या भावाला पुत्रप्राप्ती झाली, आर्थिक व्यवहार होऊन ५०% कर्जमुक्त झाले, बायकोने कुंडली अनुसार स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि मुलगा सर्व विषयात उत्तीर्ण झाला. तसेच आईला झालेला कॅन्सर आटोक्यात येऊन उपचार सुरू केले. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र द्वारे मार्गदर्शन करुन त्यांचे जीवन सुखमय झाल्याचे समाधान मला मिळाले.

तुम्हाला मिळालेल्या पुरस्काराविषयी सांगाल.

ताज हॉटेल मुंबई येथे “Excellence in Energy & Spae Alignment through Vastushashtra”
या पुरस्काराने श्री.सोनू सूद (सुप्रसिद्ध डायरेक्टर, एक्टर ) यांच्या हस्ते पुरस्कार मिळालेला आहे. मोस्ट ट्रस्टेड वास्तुशास्त्र कन्सल्टंट – इंटरनॅशनल बिझनेस अवॉर्ड (दिल्ली), महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार २०२४, उत्कृष्ट ज्योतिष मार्गदर्शक ज्योतिष विशारद पुरस्कार, रेकी ग्रैंडमास्टर पुरस्कार (ज्योतिष महोत्सव पुणे ).

ज्यांना या क्षेत्रात यायचे आहे, अश्या आजच्या युवती आणि महिलांना तुम्ही काय संदेश द्याल.

समाजानी आखून दिलेल्या चौकटी बाहेर येऊन विचार करा आणि आपले आयुष्य स्वतः घडवा. कारण म्हणतात ना, डर के आगे जीत है! वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र या क्षेत्रात वयाची मर्यादा नाही, परंतु कोणताही स्वार्थ न ठेवता समोरच्या व्यक्तीची समस्या सोडवून त्याचे जीवन सुखमय करण्याचा ध्यास आपल्या मनी असणे आवश्यक आहे. कष्ट, मेहनत, सातत्य आणि प्रत्येकासाठी असणारा सदभाव या क्षेत्रामध्ये आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात यश आणि किर्ती मिळवून देणार याची मी खात्री देते.

लेखन.. प्रा. रिता शेटीया

 

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??