ताज्या घडामोडी

जायंट्स ग्रुप ऑफ शिराळा हिरकणीच्या वतीने जायंट्स सप्ताहाची सुरुवात.

शिराळा प्रतिनिधी

बुधवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी जायंट्स दिनानिमित्त श्री गोरक्षनाथ मंदिर शिराळा येथे इंदिरा एकादशी निमित्त रक्तदान शिबिर झाले.
या रक्तदान शिबिरात ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले.रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपली जात असल्याचे मतजायंट्स ग्रुप ऑफ शिराळा हिरकणीच्या अध्यक्षा सौ.प्रज्ञा चरणकर यांनी व्यक्त केले.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांना सन्मानपत्र वाटप करण्यात आले. रक्तदान शिबिरास वसंतदादा पाटील ब्लड सेंटर मिरज टीमचे विशेष सहकार्य लाभले.यावेळी हिरकणीच्या अध्यक्ष सौ. प्रज्ञा चरणकर, कार्यवाह रेश्मा पवार, आयपीपी सरोजिनी कदम, पी आर ओ डॉ. कृष्णा जाधव, फे. अधिकारी सविता नलावडे, शितल डांगे, माजी नगराध्यक्ष सुनंदा सोनटक्के, कांचन कांबळे, मीना इंगळे, गोरक्षनाथ मंदिर येथील योगी आकाशनाथ जी, दिनकर पवार, प्रसाद चरणकर व मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??