शिराळा शहरातील एलईडी विद्युत कनेक्शन सुरक्षित करा.

शहरात झालेल्या विद्युत घोटाळ्याची चौकशी करा.
अन्यथा शिराळा नगरपंचायत समोर दे झटका शॉक आंदोलन.
– ॲड. प्रा सम्राट विजयसिंह शिंदे.
शिराळा प्रतिनिधी
निवेदनाद्वारे नगरपंचायतीस दिला आहे याबाबत कार्यवाही करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी सो व माननीय आमदार सत्यजित देशमुख यांनाही निवेदनाच्या प्रती दिली आहेत
ॲड. शिंदे दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की शिराळा नगरपंचायत च्या विविध योजनांच्या माध्यमातून नगरपंचायत विविध कॉलनी व विस्तारित भागात एलईडी सेविंग लाइट्स बसवले असून सदर बहुतांश लाइट्स बंद असून पुरवलेले विद्युत कनेक्शन रस्त्यावर नाल्यावर उघड्यावर दिसून येतात तसेच एलईडी पोलचे दोन फुटावर असणारे टोपण काही ठिकाणी निघून गेलेले आहेत यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे
शहरातील विविध सुशोभीकरणाच्या ठिकाणी विद्युत कनेक्शन घेतली असून त्याच्या वायर्स लोखंडी बॅरिकेट्स वर पसरवले आहेत त्याची कोटिंग ही गेलेली आहेत यामुळे मोठा अनर्थ घडू शकतो शहरातील विविध कारंजे बंद असून त्याची नियमित विद्युत बिले भरली जातात शहरातील स्वच्छतागृही बंद असून त्या ठिकाणी विद्युत कनेक्शन जोडले आहेत त्याची वेळोवेळी बिले अदा केली जातात का? असाही सवाल त्यांनी निर्माण केला शहरात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विविध विद्युत पेट्या बसवल्या होत्या शहरातील पाणीपुरवठा योजनेस सोलर मशीन बसवली आहे त्यातून किती विद्युत बचत होते विविध एलईडी पोल्स परवानगीने अन्य हद्दी बाहेर क्षेत्रामध्ये बसविलेले आहेत तसेच शिराळा नगरपंचायतने विद्युत सुरक्षितता अहवाल तयार करून स्टॉक रजिस्टर मेंटेन केले आहे का या गोष्टीची तपासणी होणे आवश्यक आहे सुरक्षितता व घोटाळ्याबाबत शिराळा नगरपंचायत ने योग्य ती कार्यवाही न केलेस शिराळा नगरपंचायत समोर दे झटका शॉक आंदोलन करण्याचा इशारा ॲड. सम्राट शिंदे या निवेदनाद्वारे दिला आहे.
महावितरण व नगरपंचायत यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळे हा नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे याबाबत विद्युत महामंडळाचे अभियंता खटावकर यांना वेळोवेळी बैठकांमध्ये विचारले असता सदर जबाबदारी नगरपंचायतचे आहे असे सांगितले मुख्याधिकारी सुरज कांबळे नव्याने रुजू झालेले आहेत त्यांना जुन्या कालखंडातील झालेल्या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या त्यांनी याबाबत योग्य कारवाही करतो असे आश्वासित केले आहे नगरपंचायत व विद्युत महामंडळाने समन्वय करून नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नाही
ॲड. प्रा सम्राट विजयसिंह शिंदे वंचित बहुजन आघाडी