ताज्या घडामोडी

स्वामी धाम अंत्री बुद्रुक यांचे वतीने अमृता पाटील यांचा सत्कार.

खडतर परिस्थितीशी दोन हात करून महाराष्ट्र सेट पात्रता परीक्षा उत्तीर्ण…
प्रतिकूल परिस्थिती आणि आर्थिक स्थिती हालाखीची असताना सुद्धा केवळ उच्च ध्येयाने प्रेरित होऊन कुमारी अमृता राजाराम पाटील ( राहणार शिंपे तालुका शाहुवाडी जिल्हा कोल्हापूर ) हिने महाराष्ट्र राज्य सेट पात्रता परीक्षा

( Assistant Professor ) इंग्रजी विषयातून नुकतिच उत्तीर्ण झाली आहे त्याबद्दल श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान स्वामी धाम अंत्री बुद्रुक मठ संस्थेच्या सचिव सौ रसाळ, अध्यक्ष शिवाजी रसाळ, अनिकेत कदम आणि सुनील पाटील यांच्या हस्ते अमृताचा शाल श्रीफळ व रोख रुपये 2011 देऊन सन्मान करण्यात आला.
गत तीन वर्षापासून अमृताचे वडील राजाराम पाटील हे दर गुरुवारी, पौर्णिमा व धार्मिक उत्सवात मठात येतात. स्वामींची निस्पृह सेवा करतात अमृताने सुद्धा इच्छापूर्ती स्वामीधामवर संकल्प सोडला आणि ती पहिल्याच फटक्यात सेट परीक्षा उत्तीर्ण झाली. स्वामी नाम सेवेचे तिला फळ मिळाले असे तिने आपल्या छोटे आणि भाषणात सांगितले. माझी इच्छा स्वामिनी पूर्ण केली इतरांचीही इच्छा पूर्ण करत असे स्वामी चरणी मी प्रार्थना करते. स्वामी धाम मठात समाजातील आर्थिक दृष्ट्या कमजोर होतकरू व गुणवंत मुलांना प्रोत्साहन देऊन यथाशक्ती आर्थिक मदत करून कौतुक केले जाते. त्यांचा सन्मान केला जातो.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??