नव दुर्गा स्कंदमाता सौ. डॉ. रत्नप्रभा चौधरी,संस्थापिका हव्य आयुर्वेद

आयुष्य म्हटले की चढ-उतार, आनंद, दु:ख, भावनिक समस्या, शारिरिक समस्या, मानसिक समस्या, चिंता, काळजी, ताण, निराशा, यश, अपयश, अचानक पणे येणारी संकट, घटना अशा अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात वेगवेगळे चांगले वाईट अनुभव येतात. खरे तर त्यातूनच माणूस घडतो. यासाठी आयुर्वेद सर्वोत्तम उपाय आहे. असे सांगणाऱ्या आपल्या नव दुर्गा आहेत सौ. डॉ. रत्नप्रभा चौधरी यांच्याशी नव दुर्गा विशेष २०२५ या सदर साठी खास बातचीत केली आहे रिता इंडिया फाउंडेशन च्या संस्थापिका डॉ. रिता शेटीया यांनी…
हव्य आयुर्वेद ची सुरवात कशी झाली ?
डॉ. रत्नप्रभा यांनी आपल्या क्लिनिकची सुरुवात एका लहानशा स्वप्नातून केली होती. त्यांच्या निष्ठेमुळे, कठोर परिश्रमामुळे आणि आयुर्वेदावरील अढळ विश्वासाने त्यांनी एक यशस्वी क्लिनिक उभारले. हव्य आयुर्वेद’ क्लिनिकच्या माध्यमातून यांनी केवळ रुग्णांवर उपचार केले नाहीत, तर त्यांनी आयुर्वेदाला एक परिपूर्ण जीवनशैली म्हणून लोकांपर्यंत पोहोचवले. १. उपचारापलीकडे समुपदेशन,२. कार्यशाळा आणि व्याख्याने, ३. पंचकर्म आणि योग चिकित्सा, ४. सामाजिक माध्यम आणि लेखन: आपल्या नुकत्याच प्रकाशित केलेल्या महाराष्ट्रीय सण संस्कृती आणि आयुर्वेद या पुस्तकातून सण संस्कृती आणि आयुर्वेद यांचा अनोखा मिलाप साधला आहे. या सर्व प्रयत्नांमुळे यांनी ‘आयुर्वेद’ हे केवळ एक उपचार केंद्र न ठेवता, त्याला एक आरोग्यदायी जीवनशैली शिकवणारे केंद्र बनवले.
या अंतर्गत कोणत्या सुविधा तुम्ही ग्राहकांना देतात?
आरोग्य व्यवस्थापन, PCOS, PCOD, थायरॉईड, मधुमेह (डायबेटीस) यांचे व्यवस्थापन त्वचा व केसांसाठी आरोग्यदायी आहार, वंध्यत्व चिकित्सा, आयुर्वेदिक जीवनशैली मार्गदर्शन, गर्भसंस्कार मार्गदर्शन व कार्यशाळा, पंचकर्म उपचार, जसे की, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण, नाडी चिकित्सा, म्युझिक, पुष्पौशदी अशा थेरपी, लहान मुलांसाठी स्वर्णप्राशन इत्यादी.
असा एखादा प्रसंग जेव्हा तुम्हाला नव दुर्गेचे रूप घ्यावे लागले?
एका महिला रुग्णाला नवदुर्गेच्या नऊही रूपांचे गुण डॉ. रत्नप्रभा यांच्या कार्यात प्रकट होताना दिसले.
१. शैलपुत्री – धीर आणि स्थैर्य देणाऱ्या. रुग्णांच्या मनात आशेचा किरण निर्माण करतात.
२. ब्रह्मचारिणी – साधेपणा, संयम आणि कष्टशीलता. उपचारांमध्ये प्रामाणिकपणे सातत्य ठेवतात.
३. चंद्रघंटा – शांततेतही धैर्य. रुग्णाच्या वेदना ऐकताना अंतर्मनातली ताकद झळकते.
४. कुष्मांडा – ऊर्जा आणि प्रकाश देणाऱ्या. रुग्णांना नवीन उमेद व जीवनशक्ती मिळते.
५. स्कंदमाता – मातेसारखी करुणा. रुग्णांची काळजी घेताना मातृत्व जाणवतं.
६. कात्यायनी – संयम आणि सामर्थ्य. प्रत्येक रुग्णाचं नीट ऐकून त्याला योग्य मार्ग दाखवतात.
७. कालरात्रि – निडरता. कठीण आजाराशी सामना करण्याची ताकद त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसते.
८. महागौरी – निर्मळता व करुणा. साध्या, स्वच्छ उपायांनी रुग्णाला बरे करतात.
९. सिद्धिदात्री – यश आणि समाधान देणाऱ्या. उपचारानंतर रुग्णाला आरोग्य व आनंदाचं वरदान मिळतं.
तुम्हाला मिळालेल्या पुरस्कार विषयी सांगाल.
आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. Research Excellence Award, Indus Foundation, USA (2017), Speaker Award – MULTICON 2018, IBMS (International Board of Medicine and Surgery), Bhushan Puraskar – SPDA Association (2018), Panacea Excellence Award – नेपाळ (2018), आंतरराष्ट्रीय परिषदांत Keynote Speaker Awards – (श्रीलंका, बँकॉक, लंडन), Yashashri Puraskar – समर्थ प्रतिष्ठान, आयुर्वेद क्षेत्रातील कार्यासाठी – Award by NIMA, Extraordinary Achievement Award – FPA Association, दक्षिण कोरिया (World Ayurveda Day)
सामाजिक कार्यात सहभागी आहात का ?
हो, आयुर्वेद, योग आणि आरोग्य क्षेत्रामध्ये विविध स्तरांवर महत्त्वपूर्ण सामाजिक कार्य केले आहे.
1. आरोग्य जागरूकता आणि सेवा: विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये कर्करोग, त्वचारोग आणि आयुर्वेद संशोधन याबद्दल मार्गदर्शन.
2. संस्था आणि संघटनांमध्ये सक्रिय सहभाग:NIMA (National Integrated Medical Association), SPDA Association, NASYA (National Ayurved Youth Association), FPA Association इत्यादी अनेक संघटनांमध्ये सक्रिय सदस्य/पदाधिकारी म्हणून कार्य केले. Global Ayurveda Network, International Institute of Ayurveda आणि Hungarian Ayurved Foundation यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.
3. शैक्षणिक व सामाजिक योगदान:विद्यार्थ्यांना आणि युवा डॉक्टरांना आयुर्वेद विषयक मार्गदर्शन देऊन नवीन पिढीमध्ये आयुर्वेदाचा प्रसार केला.
4. महिला व समाजासाठी योगदान:विविध आरोग्य शिबिरांमधून महिलांच्या आरोग्यविषयी मार्गदर्शन व उपचार उपलब्ध करून दिले.
5. आंतरराष्ट्रीय स्तरावरील योगदान: इंग्लंड, श्रीलंका, नेपाळ, दक्षिण कोरिया, अमेरिका, स्पेन, पोर्तुगाल यांसारख्या देशांत कर्करोग रुग्ण आणि इतर गंभीर आजारांवरील आयुर्वेदिक संशोधन व पर्यायी उपचारपद्धती व्याख्याने देऊन आयुर्वेदाचा प्रसार केला.
एक संदेश महिलांसाठी
महिलांसाठी मानसिक खास आरोग्य सल्ले:
1. “Digital Detox Time”: दिवसातून किमान ३० मिनिटे मोबाईल, सोशल मीडिया, टीव्हीपासून दूर राहा. त्या वेळेत फक्त स्वतःशी किंवा निसर्गाशी कनेक्ट व्हा.
2. “Gratitude Journal” लिहा: रोज झोपायच्या आधी तीन गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात. यामुळे मनात सकारात्मकता आणि समाधान वाढते.
3. “No-guilt Rest”: कधी कधी काहीही न करता फक्त आराम करा आणि त्याबद्दल स्वतःला दोष देऊ नका. विश्रांती हा वेळ वाया घालवणं नाही, तर मानसिक आरोग्यासाठी गुंतवणूक आहे.
4. “Say No” ची सवय लावा. प्रत्येकाची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी स्वतःला त्रास देऊ नका. जे शक्य नाही ते स्पष्टपणे नकार देण्याची ताकद ठेवा.
5. “Creative Therapy”: चित्र काढणे, नाचणे, गाणे म्हणणे, बागकाम, काहीही सर्जनशील लेखन काम करा. सर्जनशीलता मन शांत ठेवते आणि तणाव दूर करते.शब्दांकन
डॉ. रिता मदनलाल शेटीया
संस्थापिका रिता इंडिया फाउंडेशन