ताज्या घडामोडी

गुरुकुल प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन विविध क्रीडा प्रकाराने साजरा

मुरूम, ता. उमरगा, ता. ३० (प्रतिनिधी) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धाराशिव व गुरुकुल प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल, मुरूम यांच्या वतीने फिट इंडिया मोहिमेअंतर्गत हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिनी शुक्रवारी (ता. २९) रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन गुरुकुल प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल मध्ये साजरा करण्यात आला. याप्रसंगी दांडपट्टा क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील गुरुकुल प्री प्रायमरी मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त येथे विविध खेळाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यशस्वी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. भारतीय पारंपरिक दांडपट्टा खेळाचे स्पर्धा घेण्यात आल्या. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उस्फूर्त असा प्रतिसाद नोंदवला. खेळ हे जीवनासाठी किती आवश्यक आहे व त्याचे फायदे काय आहेत. याबद्दल सविस्तर माहिती आनंद चौधरी यांनी दिली. खेळ हा आपल्या जीवणाचा अविभाज्य अंग आहे. मन हे प्रफुल्लित राहण्यासाठी कोणता तरी एक खेळ खेळलाच पाहिजे, असे विचार दांडपट्टा असोसिएशन धाराशिवचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रीती चिलोबा यांनी मांडले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मयुरी चौधरी, संस्थेचे सचिव आनंद चौधरी, शिक्षिका कोमल शिंदे, सर्व शिक्षक वृंद व क्रीडा शिक्षक महमदरफी शेख यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला माता, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. फोटो ओळ: मुरूम, ता. उमरगा येथील गुरुकुल प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करताना क्रीडा शिक्षकांसह शिक्षकवृंद व खेळाडू

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??