ताज्या घडामोडी

पी.व्ही.पी. महाविद्यालयात डॉ. राव यांचा स्मृतिदिन साजरा         

कवठेमहांकाळ : प्रतिनिधी  (दि.२३)

येथील पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालयामध्ये अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि संख्याशास्त्र विभागाच्या वतीने ख्यातनाम भारतीय अमेरिकी संख्याशास्त्रज्ञ डॉ. कल्यामपुडी राधाकृष्ण राव  यांचा दुसरा स्मृतिदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) एम . के. पाटील यांच्या हस्ते व संख्याशास्त्र  विभागप्रमुख प्रा. विजय कोष्टी ,सहायक प्राध्यापक गणेश सातपुते, डॉ. अण्णासाहेब सूर्यवंशी, प्रा. शीतल पाटील, प्रा. स्नेहल झरेकर यांच्या उपस्थितीत डॉ.  राव यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर   प्रा. विजय कोष्टी  यांनी उपस्थितांचे स्वागत करून  कार्यक्रमाचा उद्देश, डॉ. राव यांचे संख्याशास्त्रातील योगदान थोडक्यात स्पष्ट केले . विभागाच्या वतीने डॉ. राव यांच्या स्मृतिदिनापासून ते त्यांच्या जयंती पर्यंत आयोजित करण्यात येणाऱ्या ऑनलाईन क्विझ, वक्तृत्व, पोस्टर प्रेझेंटेशन, रिल/ शॉर्ट व्हिडिओ मेकिंग स्पर्धांची माहिती प्रा. शीतल पाटील यांनी दिली. प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ . पाटील यांनी विद्यार्थ्यांनी डॉ. राव यांच्या जगप्रसिद्ध कार्याची ओळख करून घेऊन संख्याशास्त्राचा अभ्यास केवळ परीक्षेपुरता मर्यादित न ठेवता समाजाच्या पर्यायाने देशाच्या विकासासाठी सांख्यिकीचा उपयोग करण्याची प्रेरणा डॉ. राव यांच्या कार्यावरून घ्यावी, असे आवाहन केले. तसेच डॉ. राव यांच्यासोबतच्या त्यांच्या दोन भेटींचे प्रसंग सांगून डॉ. राव सरांचा नम्र स्वभाव, साधेपणा,अभ्यासू वृत्ती, योग्य मार्गदर्शन याविषयीचे आपले स्वतःचे अनुभव विशद केले. यावेळी बी. एस्सी. भाग एक,दोन आणि तीन तसेच बी.कॉम. भाग दोन मधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई  फुले विद्यापीठ, पुणे चे संख्याशास्त्राचे माजी विभागप्रमुख डॉ. अनिल गोरे यांनी लिहिलेली संख्याशास्त्राची विविध क्षेत्रातील उपयुक्तता विशद करणारी कविता ऐकविण्यात आली.   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शीतल पाटील यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. अण्णासाहेब सुर्यवंशी यांनी केले. शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, उपाध्यक्ष सुरेश पाटील, सचिव सुदर्शन शिंदे,प्राचार्य प्रा. डॉ.एम.के.पाटील,यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रा. गणेश सातपुते आणि प्रा. स्नेहल झरेकर यांनी मोठ्या उत्साहात केले होते.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??