ताज्या घडामोडी

कासेगांव पोलिसांची दमदार कारवाई, दोन मोटार सायकल चोरी करणाऱ्या आरोपीना अटक

मोटार सायकल चोरी करणाऱ्या आरोपीकडून एक लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

प्रतिनिधी: – बापूसाहेब कांबळे

मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे सो यांनी पोलीस ठाणेस दाखल असले मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणणेकामी आदेश दिले होते.मा. वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली कासेगाव पोलीस ठाणेकडील दाखल चोरीस गेलेल्या मोटार सायकल शोध घेत असताना गोपनीय बातमीदारमार्फत बातमी प्राप्त झाली कि, नेर्ले गावच्या हद्दीत दोन इसम विना नंबर प्लेटच्या मोटार सायकल वरून फिरत आहे.
सदर बातमीची खात्री करणेकामी पोलीस उपनिरीक्षक गायकवाड पोकॉ/305 प्रमोद पाटील, पोकॉ/ 1209 सुजित यादव यांना रवाना केले असता, हायवे कडून नेर्ले गावात जाणाऱ्या रोडवरती इसम नांवे अरविंद सतिश कुंभार व हर्षद हंबीराव मदने हे संशयित रित्या मिळून आले असता. पंचांसमक्ष त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदर मोटार सायकल शिराळा येथून काही दिवसापूर्वी चोरी केल्याचे सांगितले.
तसेच त्याच्याकडे अधिक तपास केला असता, त्याच्याकडून वाटेगांव येथून चोरी झालेली एक हिरो स्पेंडर प्लस कंपनीची मोटार सायकल व बहे येथून चोरी झालेली एक हिरो स्प्लेंडर मोटार सायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत.
सदर कारवाईत वरील नमूद पोलीस ठाणे चे गुन्हे उघडकीस आणण्यात कासेगाव पोलीस ठाणेस यश आले आहे.
1) कासेगाव पोलीस ठाणे गु. र. क्र.199/25 भा. न्या. स. क्र.303 ( 2)

2) इस्लामपूर पोलीस ठाणे गु. र. क्र.323/25 भा. न्या. स. क्र.303 (2)

3) शिराळा पोलीस ठाणे गु. र. क्र.191/25 भा. न्या. स. क्र. 303 (2) प्रमाणे आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??